कणकवलीत सिलिंडर जोडताना घेतला पेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत सिलिंडर जोडताना घेतला पेट
कणकवलीत सिलिंडर जोडताना घेतला पेट

कणकवलीत सिलिंडर जोडताना घेतला पेट

sakal_logo
By

kan295.jpg
53468
कणकवली : शहरातील जळकेवाडी येथे सिलिंडर स्फोटात वॉशिंग मशिनचे नुकसान झाले.

कणकवलीत सिलिंडर
जोडताना घेतला पेट
पडवीत वॉशिंग मशीन, टाकीचे नुकसान
कणकवली, ता. २९ : संपलेल्या सिलिंडरच्या जागी भरलेला सिलिंडर लावत असतानाच नॉब उघडल्यानंतर अचानक आगीच्या संपर्कात आलेल्या सिलिंडरने अचानक पेट घेतला. कणकवली शहरातील जळकेवाडी येथील कृष्णा चव्हाण यांच्या घरी आज सकाळी साडे आठ वाजता सुमारास ही घटना घडली.
यावेळी कृष्णा यांचा मुलगा राजू चव्हाण यांनी सतर्कता दाखवत पेटलेला सिलिंडर किचनरूमच्या बाहेरील पडवीत ढकलला. तेथे सिलिंडरचा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळांनी पडवीतील कौलेही उडाली आणि वाशांनीही पेट घेतला. स्थानिकांनी तातडीने पाणी मारून आग नियंत्रणात आणली.
सिलिंडर स्फोटाच्या घटनेत चव्हाण यांच्या पडवीतील वॉशिंग मशिन, पाण्याची टाकी जळून नुकसान झाले आहे. तसेच काही कौले आणि वाशांचेही नुकसान झाले. घटना समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मिळेल त्या साधनांचा वापर करत आग आटोक्यात आणली.