रत्नासाठी बायजू बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नासाठी बायजू बातमी
रत्नासाठी बायजू बातमी

रत्नासाठी बायजू बातमी

sakal_logo
By

५३४९६
‘बायजूस्’च्या डीएसएसएल
सीझन पाचला दमदार प्रतिसाद
रत्नागिरी, ता. २९ ः चार यशस्वी सीझन्सनंतर ‘बायजूस्‌’द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या डिस्कव्हरी चॅनेल इंडियाने बहुप्रतीक्षित अशा राष्ट्रीय स्तरावरील इंटर स्कूल क्वीझ कॉन्टेस्ट- डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग (डीएसएसएल)च्या पाचव्या सीझनची घोषणा केली. सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील क्वीझ शोसाठी शहरातील ८० टॉप शाळांमधील २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि व्यापक सहभाग दिसून येत आहे. ही युनिक ॲप्टिट्यूडवर आधारित स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये घेतली जाते. यात विद्यार्थ्यांना
त्यांच्या संबंधित राज्यांचे प्रतिनिधित्व करण्याची आणि अंतिम तीन स्थानांसाठी स्पर्धा करण्याची संधी मिळेल. या स्पर्धेचे चित्रीकरण मुंबईत केले जाईल आणि ही स्पर्धा डिस्कव्हरी नेटवर्क चॅनेल्सवर दाखवली जाईल. इतकेच नाही, तर टॉपच्या तीन विजेत्या टीमना त्यांच्या शाळेच्या प्राचार्यांसह ‘नासा’ला नि:शुल्क जायची आयुष्यातील मोठी संधी प्राप्त होणार आहे.