वैज्ञानिक दृष्टिकोनाची मुले देश घडवतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैज्ञानिक दृष्टिकोनाची मुले देश घडवतील
वैज्ञानिक दृष्टिकोनाची मुले देश घडवतील

वैज्ञानिक दृष्टिकोनाची मुले देश घडवतील

sakal_logo
By

53574
कट्टा ः वराडकर हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नितीन वाळके.


वैज्ञानिक दृष्टिकोनाची मुले देश घडवतील

नितीन वाळके ः कट्टा येथे ‘भारतीय संविधान’बाबत मार्गदर्शन

मालवण, ता. ३० : वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारी मुले उद्याचा भारत घडवतील, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी कट्टा येथे केले.
‘संविधाननिष्ठ भारतीय’ अभियानातर्फे वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव विजयश्री देसाई, सचिव सुनील नाईक, सुधीर वराडकर, मुख्याध्यापक ऋषी नाईक, पर्यवेक्षिका देवयानी गावडे, विज्ञान प्रमुख महेश भाट, संजय पेंडूरकर आदींसह आशिष पेडणेकर, जेम्स फर्नांडिस, किरण वाळके, विल्सन फर्नांडिस, हरी खोबरेकर, सरदार ताजर, भावेश बटाव, ऋतिक बटाव, रोशन कांबळी आदी उपस्थित होते.
यावेळी वाळके म्हणाले, ‘‘राज्यघटनेमुळे माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे देताना आपल्याला अनेक मूल्येही दिली आहेत. उद्याचा भारत घडवत असताना कित्येक वर्षे या मूल्यांची जडणघडत होत आहे. आज ही मूल्ये जोपासण्याची तीव्र गरज निर्माण झालेली आहे. आपण चिकित्सक राहिल्यास सत्यापर्यंत पोचता येते आणि आपले ज्ञान अबाधित राहते. समाजातील विषमतेविरुद्ध आवाज उठविणे ही आपली प्रथम जबाबदारी असून भारतीय नागरिक म्हणून किंबहुना याबद्दल संवेदनशील राहणे ही गरज असून संसदीय मार्गाने विषमतेविरुद्ध निषेध प्रकट करावा.’’
दरम्यान, भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन व त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संजय पेंडूरकर यांनी सूत्रसंचालन केले. महेश भाट यांनी आभार मानले.
--
विज्ञानाबाबत जागृती
यावेळी भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांविषयीची जागृती करण्यात आली. त्यामधीलच वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्याचा आधार घेऊन नंदकिशोर तळाशीकर यांनी प्रश्नोत्तरातून विद्यार्थ्यांच्या वैचारिक जागृतीचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग विद्यार्थ्यांसमोर दाखवले.
चमत्कारामधील विज्ञान, विज्ञानातून मुलांना नदी स्वच्छता, कोणत्याही अमिषाला बळी न पडता आपला दृष्टीकोन विज्ञानवादी ठेवणे, वाचनाचे महत्त्व सांगितले.