मोती तलावात मासेमारी केल्यास होणार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोती तलावात मासेमारी
केल्यास होणार कारवाई
मोती तलावात मासेमारी केल्यास होणार कारवाई

मोती तलावात मासेमारी केल्यास होणार कारवाई

sakal_logo
By

53582
सावंतवाडी ः येथील मोती तलावाकाठी लावलेले फलक.

मोती तलावात मासेमारी
केल्यास होणार कारवाई

भाजपच्या मागणीची पालिकेकडून दखल

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः येथील मोती तलावाच्या काठावर गळाच्या साह्याने मासेमारी करणाऱ्याविरोधात पालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. जो कोणी मासेमारी करताना दिसेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे फलक लावण्यात आले आहेत. याबाबतची मागणी सावंतवाडीचे माजी नगरसेवक तथा भाजप नेते राजू बेग यांनी केली होती. दिवसाढवळ्या व रात्री सुरू असलेल्या मासेमारी संदर्भात पालिकेने गंभीर दखल घ्यावी, असे त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना सांगितले होते. या मागणीला २४ तास होण्यापुर्वीच पालिका प्रशासनाने त्या ठिकाणी कारवाईचे फलक लावले आहेत. त्यामुळे बेग यांनी समाधान व्यक्त केले आहे. येथील मोती तलावामध्ये रात्रीच्या वेळी परप्रांतीय तसेच अन्य लोकांकडून मासेमारी केली जाते. मालिकेतील माशांमुळे पालिकेला दरवर्षी आर्थिक उत्पन्न मिळते. असे असताना तलावातील मासेमारीमुळे पालिकेला नुकसान सोसावे लागणार असल्याने बेग यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले होते.