विज्ञान मेळाव्यात पुर्वी प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञान मेळाव्यात पुर्वी प्रथम
विज्ञान मेळाव्यात पुर्वी प्रथम

विज्ञान मेळाव्यात पुर्वी प्रथम

sakal_logo
By

53578
सावंतवाडी ः पुर्वी परुळेकरला शुभेच्छा देताना राणीसाहेब सौ. शुभदादेवी सावंत भोसले. शेजारी इतर.

विज्ञान मेळाव्यात पुर्वी प्रथम
सावंतवाडी ः अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात विभागस्तरीय स्पर्धेत मदर क्विन्स इंग्लिश स्कूलच्या पूर्वी परुळेकरने ‘शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान’ विषयावर सादरीकरणात प्रथम क्रमांक पटकावला. हा मेळावा कोल्हापूर येथील श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज विक्रम नगर इचलकरंजी येथे झाला. तिला विज्ञान सल्लागार कोरे यांच्या हस्ते सन्मानित केले. ३ ऑक्टोबरला महात्मा गांधी सेवाग्राम वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने स्थान पक्के केले आहे. यात कोकण विभागाचे प्रतिनिधित्व ती करणार आहे. तिच्या या यशाबदल श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी सावंत भोसले, विश्वस्त श्रीमंत लखम सावंत भोसले, युवराजे भोसले, जयप्रकाश परब, संस्थेचे इतर पदाधिकारी, गट शिक्षण अधिकारी सौ. कल्पना बोडके, सावंतवाडी केंद्रप्रमुख सौ. स्नेहा लगये, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती प्राजक्ता मांजरेकर, एसपीके कॉलेजचे प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांचे मार्गदर्शन लाभले.