सुरक्षित ठेवीचा मार्ग दाखवणारी आधुनिक दुर्गा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरक्षित ठेवीचा मार्ग दाखवणारी आधुनिक दुर्गा
सुरक्षित ठेवीचा मार्ग दाखवणारी आधुनिक दुर्गा

सुरक्षित ठेवीचा मार्ग दाखवणारी आधुनिक दुर्गा

sakal_logo
By

rat३०p४.jpg
५३५५९
रत्नागिरी - एमआयडीसी पोस्टात सुरक्षा ठेवीचा मार्ग दाखवणारी नवदुर्गा मनिषा झगडे.
------------------
सुरक्षित ठेवीचा मार्ग दाखवणारी आधुनिक दुर्गा
टपाल खात्यातील मनिषा झगडे ;खात्यावरील विश्वास दृढ होतोय
रत्नागिरी, ता. ३० ः शासकीय सेवत काम करताना अनेक कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीचेच काम म्हणून उदासीनता दिसते; परंतु रत्नागिरीतील एका महिलेने केंद्र शासनाच्या योजना तळागाळात पोहचवत आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. एमआयडीसीतील डाकघरामध्ये कार्यरत असलेल्या मनिषा झगडे असे या आधुनिक दुर्गेचे नाव आहे. त्या पोष्टात येणाऱ्या सर्वसामान्यांना विविध योजनांची इत्थंभूत माहिती देत सुरक्षित ठेवीचा मार्ग दाखवतात. पीएलआयचे ३४ प्रस्ताव मंजूर केल्याने त्याचा १२ लाखाचा हप्ता येतो, टाटा एआयजी च्या ५८५ पॉलिसी केल्या, तीन महिन्यात १०२६ आयपीपीबी खाती उघडली. पोस्टखात्याने त्यांच्या या कामाची दखल घेऊन रत्नागिरी उपविभागात एमआयडीसी पोस्ट ऑफिसला ६ विभागात बक्षिसाने सन्मानित करण्यात आले.
डाक विभाग किंवा पोस्ट खाते ही दळणवळणाची मोठी यंत्रणा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून केंद्रांच्या या यंत्रणेचे भारतात कानाकोपऱ्यात हे जाळे पसरले आहे. नॉन बॅंकिंग कंपन्यांनी अल्पावधीत दुप्पट ते चौपट रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. या फसवणुकीच्या जमान्यात आपली हक्काची पुंजी सुरक्षित राहावी यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. बॅंकांबरोबर आपल्या ठेवी सुरक्षित ठेवण्याची हमखास हमी पोस्टात मिळते. सरकारी खात्यात आपली ठेव सुरक्षित राहते, हा सर्वसामान्य ग्राहकांचा विश्वास देण्यास पोस्ट खात्यातील कर्मचारी नेहमीच यशस्वी ठरतात. रत्नागिरी एमआयडीसी पोस्टाच्या उपडाकपाल मनीषा झगडे वैयक्तिक कामात केवळ तीन महिन्यांत १ हजार २६ आयपीपीबी खाती एकाच ठिकाणी कॅम्प लावून उघडण्यात यशस्वी झाल्या. याशिवाय पोस्टाच्या अन्य योजना ग्राहकांपर्यंत पोचवण्यातही त्या यश आले आहे.
आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने केलेल्या कामात एमआयडीसी पोस्टाला ६ बक्षिसे मिळाली आहेत. ग्रामीण विमा, अपघात विमा, बचतखाते, सुकन्या समृद्धी योजना, आधार अपडेशन इत्यादी योजना उत्तमपणे राबवल्या. त्यांच्या या कामगिरीची दखल वरिष्ठ पातळीवर घेऊन त्यांना गौरवण्यात आले. २०२१-२२ या आर्थिक वर्षातही ५८५ टाटा एलआयसी पॉलिसी कॅम्पद्वारे गोळा करत रत्नागिरी विभागामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. केंद्र शासनाच्या सर्वसामान्यांसाठी अनेक फायदेशीर आणि सुरक्षित योजना आहे. सर्वसामान्य नागरिकांना या योजनेची इत्थंभूत माहिती देऊन विश्वास दिला जातो. त्या विश्वासाने आम्ही योजना देऊ. त्यांच्या ठेवी कशा सुरक्षित राहतील, यावर मनिषा झगडे अधिक भर देतात. तेवढ्या विश्वासाने खातेदार देखील झगडे यांच्यावर विश्वास ठेवून अनेक योजनांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे पोस्टखात्यावरील विश्वास अधिक दृढ होताना दिसत आहे.

कोट
केवळ सरकारी कर्मचारी म्हणून काम न करता लोकांच्या उपयोगी योजना त्याच्यापर्यंत पोचवून एक विश्वास देण्याची गरज असते. तो विश्वास मी देण्याचा प्रयत्न करतो. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सहकाऱ्यांच्या मदतीने पोस्टाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत राहून समाधान मिळवण्याचा प्रयत्न आहे.
- मनिषा झगडे, एमआयडीसी पोस्टातील उपडाकपाल.