साखरपा ः भडकंबा सरपंच बापू शिंदे यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा ः भडकंबा सरपंच बापू शिंदे यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर
साखरपा ः भडकंबा सरपंच बापू शिंदे यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर

साखरपा ः भडकंबा सरपंच बापू शिंदे यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

rat30p19.jpg
53562
बापू शिंदे

भडकंबा सरपंच बापू शिंदे
यांना आंतरराज्य पुरस्कार
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी; कोट्यवधींची विकासकामे
साखरपा, ता. ३०ः बेळगांव येथिल नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अॅण्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यातर्फे कर्नाटक महाराष्ट्र व गोवा या राज्यातील सामाजिक, शैक्षणिक सहकार, बांधकाम, आरोग्य आधी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
साखरपा विभागातील शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते भडकंबा सरपंच प्रशांत उर्फ बापू शिंदे यांना हा प्रतिष्ठेचा आंतरराज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा 8 ऑक्टोबरला बेळगाव येथे विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. शिंदे हे अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जपत असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. ते भडकंबा ग्रामपंचायत तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या भडकंबा येथील केदारलिंग देवस्थान नवरात्रोत्सव मंडळ कोंडगाव ग्रुप विकास कार्यकारी सहकारी संस्था व्यापारी मंडळ साखरपा केदारलिंग दूध संस्था भडकंबा अशा अनेक संस्थेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहेत. भडकंबा गावासह साखरपा विभागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात त्यांना यश मिळाले आहे. भडकंबा गावामध्ये विधवा विधी प्रथा बंदी करणे हे धाडसी काम त्यांनी केले. गावामध्ये रोजगार आणि उत्पन्नवाढीच्यादृष्टीने आवश्यक असे दूध संकलन केंद्र निर्मिती करणे व्यायामशाळा, वाचनालय इत्यादी साधननिर्मिती करणे तसेच गावामधील कामगार, मजूर, निराधार व गरजू ग्रामस्थांना अनेक योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये व आवश्यक साधनसामग्री देखील त्यांच्या माध्यमातून मिळाले आहेत. आरोग्यविषयक अनेक योजना व मदत विविध संस्था व ट्रस्टच्या माध्यमातून देखील ग्रामस्थांना मिळाली आहे. गावातील शालेय कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणारे मुले-मुली व विविध शासकीय विभागातून निवृत्त होणाऱ्या इतर मान्यवरांचा यथोचित मान सन्मानदेखील केला जातो. यातील अनेक उपक्रम स्वखर्चातून शिंदे हे गेली कित्येक वर्षे करत आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.