सोनवडे प्रशालेच्या श्रेयस जोशी विज्ञान प्रदर्शनासाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनवडे प्रशालेच्या श्रेयस जोशी विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
सोनवडे प्रशालेच्या श्रेयस जोशी विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

सोनवडे प्रशालेच्या श्रेयस जोशी विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

sakal_logo
By

rat30p5.jpg
53560
साडवलीः श्रेयस जोशी बक्षीसपात्र मळणी यंत्रासह सोबत कलाशिक्षक परीट, मार्गदर्शक मेंगाल, कदम, सरदेसाई आणि इतर शिक्षक.

अवघ्या दोनशे रुपयात
बनवले मळणी यंत्र
सोनवडेचा श्रेयस जोशी; विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

एक नजर
* आधुनिक,महाग अवजाराला पर्याय
* सायकलचे चाक, लोखंडी पाईपचा वापर
* वापरण्याची पद्धत अगदी साधी अन् सोपी
* कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला शक्य

साडवली, ता. ३०ः सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, सोनवडे संचालित माध्यमिक विद्यालय सोनवडेच्या श्रेयस उदय जोशी याच्या मळणी यंत्राची प्राथमिक गटातून महाराष्ट्र राज्य ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. श्रेयस जोशी याच्या मळणी यंत्राने संगमेश्वर तालुका व रत्नागिरी जिल्हा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त केला होता. श्रेयस याला विज्ञानशिक्षक अमृत मेंगाल आणि प्रशालेतील इतर शिक्षकांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
त्याने मळणी यंत्राची माहिती देताना सांगितले, कोकणात शेती बऱ्याच प्रमाणात पारंपरिक पद्धतीने केली जाते. शेतीतून मिळणारे उत्पन्न हे अल्प
असते. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना आधुनिक अवजार घेणे परवडत नाही. अधिक कष्ट व कमी उत्पन्न या समस्येला सामोरे जावे लागते. यासाठी कमीत कमी खर्चामध्ये उपयुक्त ठरणारे हे मळणी यंत्र शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. यासाठी सहज उपलब्ध होणारे सायकलचे जुने चाक, लोखंडी पाईप व सळई यांच्या वापराने हे यंत्र बनवले असून, अत्यंत कमीत कमी खर्चात म्हणजे साधारणतः दोनशे रुपयात हे यंत्र तयार झाले आहे. ते वापरण्याची पद्धत ही सोपी आणि सहज आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला शेतीतील धान्याची मळणी करणे आता सहज शक्य झाले आहे.
श्रेयस याने मिळवलेल्या यशाचा गौरव करण्यात आला. या वेळी निवृत्त कलाशिक्षक विष्णू परीट, मुख्याध्यापक शिवाजी बंडगर, मार्गदर्शक शिक्षक अमृत मेंगाल, सुजय सरदेसाई, अभिजित कदम, सुलेखा मोहिते, सुवर्णा बनकर, मयूर तांबे, विनंती निवळकर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होते. श्रेयस याने मिळवलेल्या यशाचा संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे, अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, कार्यवाह सीमा खेडेकर, सहकार्यवाह अनिल नांदळजकर, खजिनदार योगेश शिंदे यांनी अभिनंदन केले. श्रेयस याने मिळवलेल्या यशाचा सोनवडे पंचक्रोशीत गौरव होत आहे.