वागदे अपघातात तरुण गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वागदे अपघातात तरुण गंभीर
वागदे अपघातात तरुण गंभीर

वागदे अपघातात तरुण गंभीर

sakal_logo
By

वागदे अपघातात तरुण गंभीर
कणकवली, ता. ३० : मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे डंगळवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला. मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. अमोल बागवे (वय २७, रा. बोर्डवे बागवेवाडी), असे त्याचे नाव आहे.
अमोल बागवे हा मध्यरात्री कणकवलीहून गावी बोर्डवे येथे दुचाकीवरून निघाला होता. वागदे डंगळवाडी येथे त्‍याला अज्ञात वाहनाची धडक बसली. यात तो रस्त्यावर पडून बेशुद्ध झाला. ओसरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्‍यांनतर तातडीने वाहतूक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमी बागवे याला कणकवलीतील खासगी रुग्‍णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तो बेशुद्ध स्थितीत होता. महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्राचे पोलिस संकेत चिंदरकर, सचिन करवजे, दत्ता कांबळे आदींनी घटनास्थळी जखमीला रुग्‍णालयात हलवून वाहतूक सुरळीत केली.