अपघातातील मृतदेह ताब्यात घेण्यास नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातातील मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
अपघातातील मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

अपघातातील मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

sakal_logo
By

मृतदेह ताब्यात घेण्यास
नकार दिल्याने तणाव
आक्रमक ग्रामस्थांचा घातपाताचा आरोप; कळवंडेतील अपघात
चिपळूण, ता. ३०ः तालुक्यातील कळवंडे बौद्धवाडी येथे गुरुवारी (ता. २९) दुपारी झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली; परंतु हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. या विषयी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पोलिस स्थानकावर धडक दिली. दरम्यान मृताच्या नातेवाइकांनी अद्याप मृतदेह ताब्यात घेतलेला नाही.
अपघातात आशा रवींद्र वरपे (४५) यांचा जागीच मृत्यू झाला होता तर रिक्षाचालक रवींद्र नारायण वरपे व कारचालक नंदेश सदाशिव वरपे हे जबर जखमी होते. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आक्रमक झालेले ग्रामस्थ सकाळी पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात कळवंडे ग्रामस्थांची मोठी गर्दी केली होती. सदाशिव वरपे व रवींद्र वरपे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. याकडे ग्रामस्थ निर्देश करत होते. हा घातपात झाला असावा, असा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले होते तसेच राज्य राखीव दलाच्या तुकडीस तैनात केले होते. उपचारानंतर नंदेश वरपे याला पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस स्थानकात आणले. या अपघातास २४ तास उलटले तरी मृताच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार पोलिस चौकशीत हा अपघात की घातपात याची कसून चौकशी केली जाईल, असे पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी सांगितले.