३२५ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३२५ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज
३२५ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज

३२५ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज

sakal_logo
By

३२५ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज

मुदत संपणार; निवडणूक आयोगाकडून निर्देश

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३० ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, आठ पंचायत समित्या व तीन नगरपरिषदांपाठोपाठ जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींमध्येही प्रशासक राज येणार आहे. तसे पत्र निवडणूक आयोगाने राज्याच्या ग्रामविकास विभागाला दिले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रकात कोविड १९ बाबत शासनाने लागू केलेले निर्बंध तसेच सर्वोच्च न्यायालयांमध्ये दाखल असलेल्या विविध रीट याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात आल्या आहेत. आता राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७ हजार ६४९ तसेच नवनिर्मित आठ तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या १८ अशा एकूण ७ हजार ६७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे सुमारे ७ हजार ६७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक ते नियोजन आयोगाच्या स्तरावर करण्यात येत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या मुदती जसजशा संपतील तस तसे त्या-त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करावी, असे नमूद केले आहे.
------
चौकट
मुदती डिसेंबरपर्यंत
जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक मुदती डिसेंबरमध्ये संपत आहेत. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासक बसणार आहे. जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती आहेत. यातील ३२५ ग्रामपंचायतीवर प्रशासक लागू होणार असल्याने जिल्ह्याचा बहुतांश कारभार प्रशासकाच्या हाती जाणार आहे.