सॅलड डेकोरेशनमध्ये सावंत विजेत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सॅलड डेकोरेशनमध्ये सावंत विजेत्या
सॅलड डेकोरेशनमध्ये सावंत विजेत्या

सॅलड डेकोरेशनमध्ये सावंत विजेत्या

sakal_logo
By

53782
वेंगुर्ले ः विजेत्या स्पर्धकांसोबत सुषमा प्रभुखानोलकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर व इतर.

सॅलड डेकोरेशनमध्ये सावंत विजेत्या

वेंगुर्लेतील स्पर्धा; पर्यटन व्यावसायिक महासंघाचा उपक्रम

वेंगुर्ले, ता. १ ः जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग अंतर्गत वेंगुर्ले पर्यटन तालुका महिला समिती व अन्य संस्थांतर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय फळे, फळभाज्या व भाज्या यांच्यापासून सॅलड डेकोरेशन स्पर्धेत कुडाळच्या श्रुती सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
येथील साई दरबार हॉलमध्ये लिनेस क्लब, एम.टी.डी.सी., माझा वेंगुर्ला, रोटरी क्लब, वेताळ प्रतिष्ठान तुळस, साहस प्रतिष्ठान वेंगुर्ले व पर्यटन व्यावसायिक महासंघ शाखा वेंगुर्ले यांच्यातर्फे ''जिल्हास्तरीय फळे, फळभाज्या व भाज्या पासून सॅलॅड डेकोरेशन'' स्पर्धेचे आयोजन केले होते. यात जिल्ह्यातील १७ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण हॉटेल व्यावसायिक संग्राम सावंत व अशोक धुरी यांनी केले. या स्पर्धेत काकडीपासून बाहुली, कारल्यापासून मगर, बेडूक, पडवळापासून साप, खोबरे व अफूच्या मुंडल्यापासून कासव याबरोबरच प्राणी खाद्यपदार्थ अशा विविध प्रकारच्या सॅलॅडचे आकर्षक डेकोरेशन करण्यात आले होते. द्वितीय क्रमांक श्वेता आरोसकर (वेंगुर्ले), तृतीय जान्हवी सावंत (कुडाळ), चौथा बिना भाटिया (वेंगुर्ले), तर पाचवा क्रमांक योगिता तांबे (कुडाळ) यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे २०००, १५००, १०००, ७५० व ५०० रुपयांची पारितोषिके तसेच सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रकांचे वितरण अॅड. सुषमा प्रभुखानोलकर, प्राची मणचेकर यांसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लायनेस क्लबच्या नीला यरनाळकर, हेमा गावस्कर, प्राची मणचेकर, दिशा कर्पे, रसिका मठकर, प्रार्थना हळदणकर, रोटरीच्या वृंदा गवंडळकर, माजी सभापती स्मिता दामले, माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, माजी नगरसेविका कृपा गिरप-मोंडकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर आदी उपस्थित होत्या.