ह्रदयदिनी नांदगावात जागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ह्रदयदिनी नांदगावात जागृती
ह्रदयदिनी नांदगावात जागृती

ह्रदयदिनी नांदगावात जागृती

sakal_logo
By

53785
नांदगाव ः पथनाट्य सादर करताना विद्यार्थी. शेजारी इतर.

हृदयदिनी नांदगावात जागृती
नांदगाव : नर्सिंग कॉलेज तोंडवलीच्या एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी जागतिक हृदयदिनानिमित्त नांदगाव तिठा येथे पथनाट्य सादर करून जनजागृती केली. आपल्या अवयवांतील सर्वात महत्त्वपूर्ण असलेले हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे, धुम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळून योग्य आहार घेणे या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. हृदयविकाराचा झटका आल्यास तातडीने योग्य उपचार घ्यावेत, याबाबत अनेक उदाहरणे विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिली. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, शिक्षक अविनाश शिंदे, सागर भोसले, श्रीमंत खरात आदी उपस्थित होते. यासाठी प्रा. शकुंतला नागराज यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
.............
53786
पेंडूर ः विजेत्या स्पर्धकास बक्षीस देताना वीणा दळवी, प्रसाद आडेलकर आदी.

अभंग गायनात सूरज प्रथम
सावंतवाडी ः नवदुर्गा सांस्कृतिक-सामाजिक मंडळ, पेंडूर-घोडेमुख यांच्यावतीने गोविंद गवंडे मित्रमंडळ आयोजित नवरात्रोत्सवात आयोजित केलेल्या गुरुवर्य (कै.) हरिश्चंद्र गवंडे यांच्या स्मरणार्थ खुल्या अभंग गायन स्पर्धेत सूरज पार्सेकर (न्हावेली) यांनी प्रथम क्रंमाक पटकावला. द्वितीय ममता प्रभू (आजगाव), तृतीय हेमंत गोडकर (तळवडे), तर उत्तेजनार्थ विभागून सोहम साळगावकर (आजगाव), गौरी पारकर (निरवडे) यांनी मिळविला. स्पर्धेचे परीक्षण संगीत अलंकार वीणा दळवी यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद आडेलकर यांनी केले.
...............
‘रमाई आवास’चे धनादेश वाटप
वेंगुर्ले ः रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभ मिळालेल्या आनंदवाडी येथील लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. लाभार्थ्यांमध्ये आनंदवाडी येथील चंद्रकांत जाधव, विश्राम जाधव, सुहासिनी कांबळे, बाबी जाधव, गोपाळ जाधव यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम येथील पालिका कार्यालयात झाला. या वेळी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, कार्यालयीन अधीक्षक संगीता कुबल, पालिकेचे नगररचनाकार प्रीतम गायकवाड, लेखापाल आनंद परब आदी उपस्थित होते. रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत समाज कल्याण विभागाकडे अजूनही निधी शिल्लक असून अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांनी पालिकेकडे प्रस्ताव द्यावेत, असे आवाहन केले आहे.