महनीयांच्या विचारांचा वारसा जोपासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महनीयांच्या विचारांचा वारसा जोपासा
महनीयांच्या विचारांचा वारसा जोपासा

महनीयांच्या विचारांचा वारसा जोपासा

sakal_logo
By

५३८०५

महनीयांच्या विचारांचा वारसा जोपासा

उमेश गाळवणकर; कुडाळात वक्तृत्व-निबंध स्पर्धेस प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा समाजाला तरुण पिढीला नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त करून देतात. त्यांच्या जीवन चरित्रातून सामाजिक बांधिलकी व देशप्रेमाचे धडे मिळतात, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी केले. येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे नाथ पै जन्मशताब्दी वर्ष व महिला बी.एड. महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व-निबंध स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘बॅ. नाथ पै ही संसदीय राजकारणातील एक महान विभूती होती. त्यांचे जीवन चरित्र, राजकीय कारकीर्द, लोकोद्धाराची तळमळ तरुण पिढीने या स्पर्धेच्या निमित्ताने वाचली तरी ते स्फूर्तिदायक ठरतील. लोकनेता कसा असावा, याचा वस्तुपाठ म्हणजे बॅ. नाथ पै. त्यांच्या चरित्राला-विचारांना या निमित्ताने उजळा मिळेल. स्पर्धांच्या निमित्ताने रोडावत चाललेल्या वाचन संस्कृतीलाही बळ मिळेल.’’
व्यासपीठावर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, महिला बी. एड. कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, सीबीएससी सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्रगती शेटकर आदी उपस्थित होते.
यावेळी घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रेरणा खेडेकर, सानिका जाधव (बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय), प्रणिता कोटकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन, तर पार्वती कोदे, कृपा म्हाडदळकर, प्रचिती सावंत यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. खुल्या निबंध स्पर्धेमध्ये नीता सावंत, किरण सावंत, सत्यवान कदम यांनी प्रथम तीन, उत्तेजनार्थ पारितोषिके प्रचिती सावंत, श्रुती शेवडे यांनी प्राप्त केली. वक्तृत्व स्पर्धेसाठी गणेश मर्गज, प्रा. मयूर शारबिद्रे यांनी, तर निबंध स्पर्धेसाठी प्रा. संतोष वालावलकर, प्रा. परेश धावडे यांनी परीक्षण केले. यशस्वी स्पर्धकांना विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. ऋचा कशाळीकर हिने सूत्रसंचालन, प्रा. अरुण मर्गज यांनी प्रास्ताविक तर प्रा. प्रणाली मयेकर यांनी आभार मानले.