पर्यटन मित्र पुरस्कार राजू भाटलेकर यांना प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन मित्र पुरस्कार राजू भाटलेकर यांना प्रदान
पर्यटन मित्र पुरस्कार राजू भाटलेकर यांना प्रदान

पर्यटन मित्र पुरस्कार राजू भाटलेकर यांना प्रदान

sakal_logo
By

rat२९p५.jpg
५३२९०
रत्नागिरीः महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचा पर्यटनमित्र पुरस्कार राजू भाटलेकर यांना प्रदान करताना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील. सोबत विद्या कुलकर्णी, रमेश कीर, प्रशांत वाणी, संजय यादवराव आदी.
------------
राजू भाटलेकर यांना पर्यटनमित्र पुरस्कार
पर्यटन संचालनालय; नवीन संकल्पना राबवण्यात पुढाकार
रत्नागिरी, ता. १ः रत्नागिरीच्या पर्यटनवाढीसाठी योगदान देणाऱ्या राजू भाटलेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचा कोकण विभागाचा पर्यटनमित्र पुरस्कार देऊन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक प्रशांत वाणी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
राजू भाटलेकर हे गेली पंधरा वर्षे पर्यटन उद्योगवाढीसाठी पर्यटन परिषद, महोत्सव भरवत असून ते रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवासंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. जागतिक पर्यटनदिनाचे औचित्य साधून अल्पबचत सभागृहात पर्यटन संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी राजू भाटलेकर यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवले. या कार्यक्रमाला जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, कोकणभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख संजय यादवराव आदी उपस्थित होते.
पर्यटन गाईड तयार करणे, स्थानिक पर्यटनस्थळांवर सोयीसुविधांसाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करणे, त्याकरिता पर्यटनमंत्र्यांशी कायम संपर्कात राहणारे भाटलेकर यांनी योगदान दिले आहे. २०१२ मध्ये त्यांनी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेची स्थापना केली. त्या मार्फत पर्यटन परिषद, जागतिक पर्यटनदिन महोत्सव यांचे आयोजन केले. पर्यटनस्थळांवर सुविधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बैठका आयोजित करून मदत करतात. पर्यटन महोत्सवामध्ये ते नेहमीच जिल्ह्यातील व शेजारच्या जिल्ह्यांतील यशस्वीपणे वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन करणाऱ्या उद्योजकांना आणून त्यांची व्याख्याने आयोजित करतात. त्यामुळे स्थानिक नवउद्योजकांना पर्यटन म्हणजे काय, त्यात कसे काम करावे, व्यवसाय कसा करावा, नवीन संकल्पना कशा राबवाव्यात याचे योग्य मार्गदर्शन मिळाले. त्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत अनेकांनी पर्यटन उद्योगात पाऊल ठेवले असून त्यांना यश मिळू लागले आहेत.

चौकट
पर्यटन केंद्रासाठी प्रयत्न
पुढील काळात पर्यटन केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. भविष्यात कोकणातील लोककला पर्यटकांना दाखवण्याचा प्रकल्प सुरू करणार असून त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. पर्यटन वाढण्यासाठी माहितीकेंद्राची निर्मिती आणि स्थानिक आंबा, काजूपासून बनवलेल्या पदार्थांची आणि कोकणी जेवणाला बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचे राजू भाटलेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.