मंडणगडमधील आरोग्य शिबिरात गरोदर माता, बालकांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगडमधील आरोग्य शिबिरात गरोदर माता, बालकांची तपासणी
मंडणगडमधील आरोग्य शिबिरात गरोदर माता, बालकांची तपासणी

मंडणगडमधील आरोग्य शिबिरात गरोदर माता, बालकांची तपासणी

sakal_logo
By

rat1p7.jpg-
53862
मंडणगड : महाआरोग्य मेळाव्यात मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी सुवर्णा बागल.
------------
मंडणगडमधील आरोग्य शिबिरात
गरोदर माता, बालकांची तपासणी
मंडणगड, ता. १ः माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाचे अंर्तगत १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पंचायत समिती मंडणगड यांच्यावतीने गटविकास अधिकारी सुवर्णा बागल यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगळोली ग्रामीण रुग्णालयात महिला व बालकांसाठी मोफत महाआरोग्य मेळावा झाला. गरोदर महिला व बालके या मेळाव्याला उपस्थित होते.
योगिता डेंटल कॉलेज, वालावलकर रुग्णालय, मंडणगड ग्रामीण रुग्णालय व तालुका आरागेय विभागातर्फे हा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात फिजिशियन व ह्रदयरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, स्त्री रोगतज्ञ, नाक कान घसा तज्ञ, अस्थिरोगतज्ञ व नेत्रचिकित्सा तज्ञ उपस्थित होते. या वेळी ईसीजी, रक्त तपासणी, हाडांची ठिसुळता, ब्लड शुगर तपासणी, लहान मुलांची तपासणी, डोळ्यांची तपासणी व दंतचिकित्सा आदी तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी सुवर्णा बागल, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश सावंत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके, डॉ. भावठाणकर, डॉ. अविनाश लोकडे, डेंटल कॉलेजच्या डॉ. अनामिका गुप्ता व त्यांचे सहकारी, डेरवण वालावलकर रुग्णालयाचे डॉ. रोहित गुंजाळ आदी उपस्थित होते.
आर्थिक परिस्थितीमुळे सोनोग्राफी व तत्सम तपासण्या करू न शकणाऱ्या गरजू गर्भवती महिलांचा शोध या मोहिमेसाठी घेतला जात असून गरजू महिलांची सोनोग्राफी व सर्व तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. यासाठी १५ वित्त आयोगातून निधीची तरतूदही केली जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुवर्णा बागल यांनी दिली.