पान एक-जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले
पान एक-जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले

पान एक-जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले

sakal_logo
By

पान एक

जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले
मुंबईत आरक्षण सोडत; पुढील अडीच वर्षांसाठी निश्चिती
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे. मागील पाच वर्षे अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित होते. परिणामी पाच वर्षांनंतर अध्यक्षपद सर्वसाधारण झाल्याने चुरस वाढणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची पंचवार्षिक मुदत मार्च २०२२ मध्ये संपली आहे. ओबीसी आरक्षण, कोरोनामुळे विहित मुदतीत निवडणूक आयोग निवडणुका घेऊ शकले नव्हता. परिणामी शासनाने येथे प्रशासक नियुक्त केला आहे. गेले पाच महिने जिल्हा परिषदेवर प्रशासक कार्यरत आहे; परंतु पुढील काही महिन्यांत जिल्हा परिषदेसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ही निवडणूक झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राहील, यासाठी मुंबई येथे काल (ता. ३०) आरक्षण सोडत काढली. यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद २०१८ ते २०२२ ही पाच वर्षे महिलांसाठी आरक्षित राहिले आहे. यातील पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते, तर त्यानंतरची अडीच वर्षे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित राहिले होते. या पाच वर्षांपूर्वीची शेवटची अडीच वर्षे अध्यक्षपद सर्वसाधारण राहिले होते. त्यामुळे आता पाच वर्षांनी पुन्हा अध्यक्षपद सर्वसाधारण राहिले आहे.

चढाओढ होणार
अध्यक्षपद सर्वसाधारण राहिल्याने यासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वसाधारण आरक्षण राहिलेल्या प्रभागातून निवडून येण्यासाठी उमेदवारांत चुरस निर्माण होणार आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविणे आणि निवडून येण्यापासून ते अध्यक्षपद मिळविण्यासाठी चढाओढ दिसणार आहे.