2 ऑक्टोबरला सबज्युनिअर जिल्हास्तरीय फेन्सिंग निवडचाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

2 ऑक्टोबरला सबज्युनिअर जिल्हास्तरीय फेन्सिंग निवडचाचणी
2 ऑक्टोबरला सबज्युनिअर जिल्हास्तरीय फेन्सिंग निवडचाचणी

2 ऑक्टोबरला सबज्युनिअर जिल्हास्तरीय फेन्सिंग निवडचाचणी

sakal_logo
By

सबज्युनिअर जिल्हास्तरीय
फेन्सिंग निवडचाचणी आज
रत्नागिरी, ता. १ः महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्यावतीने व अहमदनगर जिल्हा फेन्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने ८ ते १० ऑक्टोबरला २४ व्या सबज्युनिअर राजस्तरीय फेन्सिंग स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडासंकूल, अहमदनगर येथे केले आहे. या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा फेन्सिंग असोसिएशनच्यावतीने झोरेज स्पोर्टस अॅकॅडमी, मारुती मंदिर येथे येत्या २ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय सबज्युनिअर फेन्सिंग निवडचाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी खेळाडू १ जानेवारी २००६ नंतर जन्मलेला असावा. सहभागी होणाऱ्या खेळाडूचे स्वतःचे फेन्सिंग कीट असणे आवश्यक आहे. निवड चाचणीला येताना वयाचा मुळ दाखला, आधारकार्ड व चार फोटो आवश्यक आहेत. या जिल्हा निवडचाचणीतून फॉईल, इप्पी व सैबर या तीन प्रकारातून प्रथम येणाऱ्या चार खेळाडूंना (मुले व मुली) अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता जिल्हा संघात निवड होईल. निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र राज्य फेन्सिंग असोसिएशनचा रजिस्टर्ड खेळाडू असणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी समिधा झोरे, प्रियदर्शनी जागुष्टे यांच्याशी संपर्क साधावा.