सुपारी भरपाईसाठी पवारांना साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपारी भरपाईसाठी पवारांना साकडे
सुपारी भरपाईसाठी पवारांना साकडे

सुपारी भरपाईसाठी पवारांना साकडे

sakal_logo
By

सुपारी भरपाईसाठी पवारांना साकडे

शेतकऱ्यांचे निवेदन; दोडामार्ग तालुक्यातील नुकसान

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग ता. १ : तालुक्यातील नारळ, सुपारी पिकांच्या नुकसानीची तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे तळकट येथील रामचंद्र सावंत यांनी माजी केंद्रीय कृषी, फलोत्पादन मंत्री शरद पवार यांच्याकडे केली. श्री. पवार जिल्हा दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेत निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, दोडामार्ग तालुक्यात नारळ, सुपारी, केळी, काजू, भात, नागली, भुईमुग आदी महत्त्वाची पिके घेतली जातात; परंतु शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सतत सामोरे जावे लागत आहे. शासनाकडून शेतकरी, बागायतदारांना योग्य मदत मिळत नाही. कृषी विभागामार्फत खरीप भातपीक तसेच आंबा, काजू, नारळ ही पिके फळ पिकांमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे कोकणामध्ये अतिपाऊस किंवा चक्रीवादळ झाल्यास महाराष्ट्र शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते. तसेच पिकांचा विमा सुध्दा काढला जातो; परंतु सुपारी पिकाचा यात समावेश नसल्याने नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे इतर पिकांप्रमाणे सुपारी पिकाला नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट करावे. कोकणामध्ये अतिपाऊस असल्याने सुपारी पिकावर कोळी रोग मोठ्या प्रमाणात आढळून सुपारीची गळ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सुपारी पिकांचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई मिळून द्यावी. शासनाकडून शेतकऱ्यांना विविध अवजारांना ५० टक्के अनुदान दिले जाते; परंतु सुपारीच्या झाडावर चढण्याची शिडी तसेच सुपारी काढण्यासाठी मशिन, सुपारी फवारणी यंत्र व सुपारी सोलण्याचे मशिनयांचा या योजनेत समावेश नाही. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही. वरील अवजारांना शासनाकडून अनुदान मिळावे. सुपारी झाडांचा विमा उतरून घ्यावा. जेणे करून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास विमा कपंनीकडून नुकसान मिळू शकेल. सुपारी पिकास ठिबक सिंचनसाठी अनुदान देण्यात यावे. सुपारी पिकांना हमीभाव द्यावा. दोडामार्ग तालुक्यामध्ये काजुगरांचे युनिट आहेत. त्याप्रमाणे सुपारीची युनिट उभारणीसाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान द्यावे. सुपारी बागायदारांची सोसायटी तयार करण्यासाठी प्रोत्साहन भत्ता द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी रामचंद्र सावंत (तळकट), विलास सावंत (डिंगणे), विकास सावंत, विकास सावळ, शरद देसाई, गोविंद गवस आदी उपस्थित होते.