चिपळूण-अपहरणाचा प्रयन्त झाल्याची ठोकली लोणकढी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-अपहरणाचा प्रयन्त झाल्याची ठोकली लोणकढी
चिपळूण-अपहरणाचा प्रयन्त झाल्याची ठोकली लोणकढी

चिपळूण-अपहरणाचा प्रयन्त झाल्याची ठोकली लोणकढी

sakal_logo
By

शाळकरी मुलीने अपहरणाची ठोकली लोणकढी
शाळेत जाण्याचा कंटाळा; पोलिस लागले कामाला; कुटुंबीयांचा निःश्‍वास
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १ : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवेने जोर धरला आहे. गावात कोणीही अनोळखी महिला किंवा पुरुष दिसला की त्याला मारहाण झाल्याच्या घटना घडत आहेत. तसाच काहीसा प्रकार गुरुवारी (ता. २९ सप्टेंबर) खेड तालुक्यात घडला. एका १२ वर्षीय मुलीने आपल्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरडाओरडा केला. मात्र शाळेत जाण्याचा कंटाळा आल्याने मुलीने अपहरणाचा प्रयत्न केल्याचे खोटेच सांगितल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे साऱ्यांच्याच जीव भांड्यात पडला.
खेड तालुक्यातील एका १२ वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे वृत्त प्रसारित झाले; मात्र प्रत्यक्षात पोलिसांकडे चौकशी केली असता संबंधित मुलीला तिची आई जबरदस्तीने शाळेत घेऊन जात असताना तिने आरडाओरडा करून तोंडावर रुमाल टाकून आपल्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा कांगावा केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरत असल्याचा संदेश सोशल मीडियावरून सर्वत्र पसरल्याने नागरिक एकमेकांकडे संशयाने पाहू लागले असून रत्नागिरी येथे केवळ संशयातून महिलेला जमावाने मारहाण केल्याची घटना देखील समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना मुलीचा कांगावा खरा वाटला आणि मुलीचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. दरम्यान, तिची आईदेखील तिथे आली. आपल्या मुलीला पळवून नेण्याच्या प्रयत्न झाला हे पाहून मुलीची आई भेदरून गेली. कुणीतरी पोलिसांत जायचा सल्ला दिला. मुलीचा अपहरण करण्याच्या प्रयत्न करणाऱ्याचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली. खेडच्या पोलिस निरीक्षक निशा जाधव यांना मुलीच्या माहिती देण्यामध्ये विसंगती आढळून येत होती. त्यामुळे त्यांनी मुलीकडे पुन्हा विचारणा केली असता रात्री मुलीने मला शाळेत जायचा कंटाळा आला होता, म्हणून मीच मला पळवून नेण्याचा प्रयत्न झाला, असे नाटक केल्याचे सांगितले.


पोलिसांचा खबरदारीचा सल्ला
या प्रकारानंतर सोशल मीडियाद्वारे पसरवलेला खबरदारीचा सल्ला मात्र अद्याप फिरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात पोलिसांना ताप झाला असून कोणीही अफवा पसरवून नये असे आवाहन करण्यात येत आहे. भीती पसरवणाऱ्या संदेशाची सत्यता पडताळून मगच पुढे पाठवावा, अन्यथा ते अडचणीत येऊ शकतात. असा सल्ला पोलिस व प्रशासनाकडून देण्यात येत आहे.