खेड-पोयनार धरणाची उंची वाढविणे मार्गी लावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-पोयनार धरणाची उंची वाढविणे मार्गी लावा
खेड-पोयनार धरणाची उंची वाढविणे मार्गी लावा

खेड-पोयनार धरणाची उंची वाढविणे मार्गी लावा

sakal_logo
By

पोयनारची उंची वाढविणे मार्गी लावा
खासदार सुनील तटकरे; धरणासाठी निधी कमी पडू देणार नाही
खेड, ता. १ : न्यू मांडवे धरण, पोयनार धरणाची उंची वाढविणे, संपादन केलेल्या घरांचे, झाडांचे पैसे देणे, पुनर्वसन इतर प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आदेश संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठकीत दिले. धरणाच्या कामासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
तालुक्यातील शासकीय विकास कामाबाबत खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी ( ता. ३०) सायंकाळी ५ वाजता तटकरे सभागृहात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत न्यू मांडवे धरण, पोयनार धरण, जल मिशन योजना, महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणाच्या कामाअंतर्गत प्रलंबित कामे याबाबत चर्चा करण्यात आली. ७४ शेतकऱ्यांना कृषी पंप देण्याचे ग्वाही महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवतारे यांनी आढावा बैठकीत दिली. भरणा नाका येथे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्याबाबत सूचना महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना यावेळी देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याच्या अंतर्गत येणारे खेड ते आंबवली, खेड ते बहिरवली व अन्य प्रमुख रस्त्यांची तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत येणा-या रस्त्यांची दुरूस्ती करून रस्ते वाहतुकीस सुरळीत करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
कृषी विभाग अंतर्गत कामांचा या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. उपस्थित विविध खात्याच्या अधिका-यांनी सकारात्मक उत्तर देऊन समस्या मार्गी लावण्याबाबतची ग्वाही दिली. आढावा बैठक समस्यांची निवारणार्थ यशस्वी झाल्याबद्दल तटकरे यानी समाधान व्यक्त करून जल मिशन योजनांचे प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करून ही योजना गतिमान करून तालुका टँकरमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे असे तटकरे यांनी सांगितले.
या आढावा बैठकीला अभियंता मुळ्ये, नायब तहसीलदार गिरी, महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवतारे, बाबाजीराव जाधव, संजय कदम, अजय बिरवटकर, स. तु.कदम, शंकर कांगणे, संदीप राजपुरे, प्रकाश मोरे, विनायक निकम, जलाल राजपूरकर उपस्थित होते.
-------------------------------------
चौकट
अधिकाऱ्याला खड्या शब्दात सुनावले
मंडळ अधिकारी कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास टाळाटाळ करीत शेतक-यांना वेठीस धरत असल्याबाबत माजी सरपंच विनायक निकम यांनी तक्रार केली होती. त्यावर मंडळ अधिकाऱ्याने आपल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. आपण अधिकाऱ्यांपेक्षा मोठे नाहीत. याची जाणीव ठेवावी, असे स्पष्ट सांगून मंडळ अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. कर्जाचा बोजाची नोंद शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर करावी, अशा सूचना तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना केल्या.