व्यापाऱ्याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयिताच्या कोठडीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापाऱ्याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयिताच्या कोठडीत वाढ
व्यापाऱ्याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयिताच्या कोठडीत वाढ

व्यापाऱ्याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयिताच्या कोठडीत वाढ

sakal_logo
By

व्यापाऱ्याच्या खूनप्रकरणी संशयिताच्या कोठडीत वाढ
रत्नागिरी, ता. १ ः सोने-चांदीचे व्यापारी कीर्तीकुमार अजय राज कोठारी (वय ५५, रा. भाईंदर मुंबई) यांचा खून करणाऱ्या तीन संशयितांपैकी भूषण सुभाष खेडेकर (४२, रा. खालची आळी, रत्नागिरी) याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली. या गुन्ह्यातील त्याचे साथीदार महेश मंगलप्रसाद चौगुले (३९, रा. मांडवी सदानंदवाडी), फरीद महामुद होडेकर (३६, रा. भाट्ये, रत्नागिरी) या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शनिवारी (ता. १) संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना न्यायालयात हजर केले होते.