खेड-कशेडी घाटात दगडी कोळसा ट्रक उलटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-कशेडी घाटात दगडी कोळसा ट्रक उलटला
खेड-कशेडी घाटात दगडी कोळसा ट्रक उलटला

खेड-कशेडी घाटात दगडी कोळसा ट्रक उलटला

sakal_logo
By

rat१p११.jpg
५३८९७
खेडः महामार्गावर उलटलेला ट्रक क्रेनच्या मदतीने बाजूला करताना महामार्ग पोलिस.
-rat१p१२.jpg-
५३८९८
कशेडी घाटात ट्रक उलटल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
--------------
कशेडी घाटात ट्रक उलटला
वाहतूक विस्कळित; महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा
खेड, ता. १ : खेड तालुक्यात आज परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असल्याने निसरड्या झालेल्या रस्त्यावरून दगडी कोळसा वाहू ट्रक उलटून अपघात झाला. या अपघातात चालकाचे दैव बलवत्तर म्हणून तो सहीसलामत बचावला. अपघातानंतर कशेडी घाटात वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
महाडवरून लोटे औद्योगिक वसाहतीत दगडी कोळसा घेऊन जाणारा ट्रक कशेडी घाट उतरत असताना सुरू असलेल्या पावसामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक काळकाई मंदिराजवळ उलटला. या अपघातात ट्रकचा चालक बचावला. सकाळी दहा वाजल्यापासून खेड तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असल्याने महामार्ग निसरडा झाला आहे. शिवाय घाटात पावसामुळे निर्माण झालेल्या धुक्यामुळे वाहने हाकताना चालकांचा कस लागत आहे. कशेडी घाटात अपघातग्रस्त झालेल्या ट्रक हा महाड येथून दगडी कोळसा घेऊन खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत येत होता. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा ट्रक कशेडी घाट उतरत असताना पाऊस कोसळतच होता. रस्ताही निसरडा झाला होता. त्यामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक रस्त्यात उलटला.
या अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. महामार्गावरून प्रवास करणारे अनेकजण अडकून पडले. अपघाताची खबर मिळताच कशेडी टॅपचे वाहतूक पोलिस उपनिरीक्षक अनिल चांदणे सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान खेड पोलिस घाटात दाखल झाले होते. रस्त्यात उलटलेल्या ट्रक क्रेनच्या साह्याने बाजूला करून पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. खेड पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.