गुहागर-अंजनवेल, वेलदूरला जोरदार संघर्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर-अंजनवेल, वेलदूरला जोरदार संघर्ष
गुहागर-अंजनवेल, वेलदूरला जोरदार संघर्ष

गुहागर-अंजनवेल, वेलदूरला जोरदार संघर्ष

sakal_logo
By

अंजनवेल, वेलदूरला जोरदार संघर्ष
ग्रामपंचायत निवडणूकः वेळंब, परचुरी बिनविरोध, चिंद्रावळे सरपंच बिनविरोध
गुहागर, ता. १ : तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वेळंब व परचुरी या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांसह सरपंच निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिंद्रावळे सरपंचपदही बिनविरोध झाले आहे. अंजनवेल व वेलदूर या दोन मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांसह सरपंचपदासाठी निवडणूक अटळ आहे.
तालुक्यातील वेळंब व परचुरी या दोन ग्रा. पं. मध्ये निवडणुक बिनविरोध झाली आहे. वेळंब येथे तीन प्रभागासाठी नऊ उमेदवार उभे राहिले होते. त्यांच्या विरोधी कुणीही नामांकन न भरल्यामुळे त्यांची उमेदवारी बिनविरोध झाली आहे. त्यांना गावातर्फे पाठिंबा देण्यात आला. सरपंच पदासाठी खुल्या वर्गातून तिघींनी अर्ज भरले होते. त्यापैकी दोघींनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे समिक्षा बारगोडे सरपंचपदासाठी बिनविरोध निवडून आल्या. परचुरी ग्रा.पं.च्या तीन प्रभागासाठी एकूण सात उमेदवार निवडून घायचे होते. ग्रामस्थांनी एकत्र बसून हे सात उमेदवार निश्चित केले व त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. हे सर्व उमेदवार वैध ठरल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानंतर सरपंच पदावर सौ. प्रतीक्षा प्रदीप भुवड यांना निवडण्यात आले. त्याचप्रमाणे उपसरपंचपदावर अशोक भुवड व संदीप डाफळे यांना संधी देण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
गुहागर तालुक्यातील मोठी ग्रा. पं. असलेल्या वेलदूर व अंजनवेल ग्रा. पं.च्या प्रत्येकी ११ जागांसाठी मोठी अटीतटीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंजनवेल ग्रामपंचायतीच्या चार प्रभागामध्ये ११ सदस्यांसाठी तेरा अर्ज दाखल झाले आहेत. सरपंचपदासाठी दोन उमेवार रिंगणात आहेत. वेलदूर ग्रामपंचायतीमध्ये एकाच जागेसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी बारा उमेदवार उभे आहेत. सरपंच पदासाठी दोन उमेदवार उभे आहेत. चिंद्रावळे ग्रा. पं. मध्ये नऊपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर एका जागेसाठी दोन उमेदवार उभे आहेत. असे असले तरी सरपंचपद बिनविरोध झाले आहे.