देवगड किनारपट्टीला पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड किनारपट्टीला पावसाने झोडपले
देवगड किनारपट्टीला पावसाने झोडपले

देवगड किनारपट्टीला पावसाने झोडपले

sakal_logo
By

देवगड किनारपट्टीला पावसाने झोडपले
देवगड ः तालुक्याच्या किनारपट्टी भागाला आज सायंकाळी पावसाने झोडपून काढले. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला. पावसामुळे देवगड जामसंडे शहराचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तालुक्यात काल (ता. ३०) सायंकाळपासून पावसाळी वातावरण तयार झाले होते. काही भागात हलका पाऊसही झाला. आज सकाळी वातावरण कोरडे होते. ऊन पडले होते; मात्र सायंकाळी पाचनंतर पाऊस झाला.
............................
सोनुर्लीत आज दशावतार नाटक
सावंतवाडी ः श्री देवी भवानी मंदिर सोनुर्ली-पाक्याचीवाडी ग्रामस्थ आणि मित्रमंडळातर्फे आयोजित नवरात्रोत्सवानिमित्त उद्या (ता. २) रात्री साडेनऊला श्री अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ, निरवडे यांचा ‘माहेरवाशिणी भवानी आई’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.