केशवसुत कट्ट्यावर गप्पा, गाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केशवसुत कट्ट्यावर गप्पा, गाणी
केशवसुत कट्ट्यावर गप्पा, गाणी

केशवसुत कट्ट्यावर गप्पा, गाणी

sakal_logo
By

केशवसुत कट्ट्यावर गप्पा, गाणी
सावंतवाडी ः केशवसुत कट्ट्यावर गप्पा, गाणी, किस्से असा कार्यक्रम रंगला. यावेळी प्रा. अरुण पणदूरकर, दत्तप्रसाद गोठोसकर, कुलकर्णी, मुकुंद वझे, वामन देसाई, विश्वास जोशी, एम. व्ही. डॉ. सोनारे, प्रदीप ढोरे, प्रदीप प्रियोळकर, मावळंकर, शंकर प्रभू श्याम भाट, डॉ. मधुकर घारपुरे उपस्थित होते. यावेळी निवृत्त प्रा. एम. व्ही. कुलकर्णी आणि निवृत्त बँक अधिकारी मुकुंद वझे यांनी मनोगत व किस्से सांगितले. प्रा. पणदूरकर व संजय मावळंकर यांनी कविता सादर केल्या. बालकल्याण समिती सदस्य अरुण पणदूरकर यांनी या समितीचे महत्वाबाबत माहिती दिली. प्रियोळकर, शंकर प्रभू आणि डॉ. चंद्रकांत सोनारे यांनी गाणी म्हणून वातावरण सुरेल केले. डॉ. घारपुरे यांनी पूर्वीप्रमाणे केशवसुत कट्ट्यावर मासिक कार्यक्रम व्हावेत, असे आवाहन केले.
--
रेल्वे गाडीला जादा बोगी
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रूनवेली-जामनगर एक्स्प्रेसला (१९५७७) ३ व ४ ऑक्टोबरला एक जादा बोगी जोडण्यात येत आहे. प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन ही स्लीपर कोच स्वरुपाची बोगी जोडण्यात येत असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या गाडीला दक्षिण कोकणमध्ये रत्नागिरी स्थानकावर
थांबा आहे.
--
सावंतवाडीत व्यसनमुक्ती रॅली
सावंतवाडी ः व्यसनमुक्ती सावंतवाडी सप्ताहानिमित्त मंगळवारी (ता.४) सकाळी दहाला शहरात व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबईच्या अर्पिता मुंबरकर यांनी
केले आहे.