रत्नागिरी- टीडब्लूजेतर्फे र. ए. सोसायटीला 40 संगणक संच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- टीडब्लूजेतर्फे र. ए. सोसायटीला 40 संगणक संच
रत्नागिरी- टीडब्लूजेतर्फे र. ए. सोसायटीला 40 संगणक संच

रत्नागिरी- टीडब्लूजेतर्फे र. ए. सोसायटीला 40 संगणक संच

sakal_logo
By

टीडब्लूजे कंपनीततर्फे
४० संगणक संच भेट
रत्नागिरी, ता. २ : रत्नागिरी एज्युकेशन संस्था शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था असून अनेक नामवंत माजी विद्यार्थी या संस्थेशी संबंधित आहेत. आजही विविध माध्यमातून जोडले गेलेले आहेत. संस्थेचा अमृत महोत्सव सुरू असून त्या निमित्ताने टीडब्लूजे कंपनीने डेल ऑप्टीप्लेक्सचे ४० संगणक, २ ग्राफिक्स कार्ड रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीस भेट दिले.
ही भेट देण्यामागे संगणकशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी आणि कंपनीचे संचालक समीर नार्वेकर, सौ. नेहा नार्वेकर, सुरज सोकासने, प्रसन्न करंदीकर आणि रत्नागिरी शाखाधिकारी सुशांत विचारे यांचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्यादृष्टीने सदैव कार्यरत रत्नागिरी एज्युकेशन संस्थेत विद्यार्थी कौशल्य विकास आधारित अनेक उपक्रम सुरू आहेत. यातूनच नोकरी, व्यवसाय आदी विषयांशी संबंधित अनेक संधी उपलब्ध होतात. याचीच जाणीव ठेऊन अनेक माजी विद्यार्थी संस्था व महाविद्यालयास अनेक पद्धतीने आर्थिक, वस्तुरूपाने मदत करीत असतात. माजी विद्यार्थ्यांच्या अशा कृतज्ञतापूर्ण भेटीतूनच त्यांची संस्थेबद्दल व महाविद्यालयाबद्दलची आस्था दिसून येते. विद्यार्थांच्याप्रती असणारी संस्था व महाविद्यालयाची कार्यनिष्ठा व त्याचेच फलित भेट रूपाने प्राप्त झालेली संसाधने म्हणून पाहता येईल. संगणकशास्त्र विभागप्रमुख अनुजा घारपुरे, समीर नार्वेकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून ही देणगी संस्थेस प्राप्त झाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांनी टी.डब्लू.जे. कंपनी असोसिएटचे संचालक समीर नार्वेकर व सौ. नेहा नार्वेकर यांचे आभार मानले. तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर यांच्या उपस्थितीत सुरज सोकासने व प्रसन्न करंदीकर यांनी संगणक संस्थेस प्रदान केले.