ओणी पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओणी पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
ओणी पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

ओणी पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

sakal_logo
By

rat2p29.jpg
54130
राजापूरः प्रवेशकर्त्यांसमवेत रवींद्र नागरेकर, अभिजित गुरव, अभिजित कांबळे, मारूती कांबळे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते.
-----------
ओणीतील कार्यकर्त्यांचा
भाजपमध्ये प्रवेश
राजापूर, ता. २ : तालुक्यातील ओणी, खरवते, हातिवले, आडीवरे, गोठणेदोनिवडे, गोवळ येथील अनुसूचित जाती-जमातीतील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेश कर्त्यांचे तालुका भाजपच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी तालुक्याची अनुसुचित जाती मोर्चाची कार्यकारणीही जाहिर करण्यात आली. अनुसूचित जाती मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी प्रकाश लक्ष्मण गोठणकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी दिली.
तालुकाध्यक्ष श्री. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश सदस्य अनुसूचित जातीसेलचे मारुती कांबळे व जिल्हा उपाध्यक्ष अभिजित कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश आणि कार्यकारिणी जाहिर करण्याचा कार्यक्रम कोदवली येथील हॉटेल गुरूमाऊली सभागृहामध्ये झाला. या वेळी भाजप सहकार सेल जिल्हा अध्यक्ष अनिल करगुटकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शीतल पटेल, तालुका महिला आघाडी उपाध्यक्षा शीतल रहाटे, युवा सेलचे सरचिटणीस अरविंद लांजेकर, शीळ सरपंच अशोक पेडणेकर, संदेश विचारे उपस्थित होते.

चौकट
अनुसूचित जाती मोर्चा कार्यकारणी जाहीर
अध्यक्षः प्रकाश लक्ष्मण गोठणकर, उपाध्यक्षः डॉ. नंदकुमार आनंदा कांबळे, प्रशांत यशवंत जाधव, सरचिटणीसः संतोष शंकर कदम, सचिवः मिलिंद सोमा खरवतेकर, सोशल मिडिया प्रमुखपदीः अनिकेत कृष्णा जाधव