पाली बसस्थानक परिसराची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाली बसस्थानक परिसराची स्वच्छता
पाली बसस्थानक परिसराची स्वच्छता

पाली बसस्थानक परिसराची स्वच्छता

sakal_logo
By

at२p२३.jpg-
54109
पालीः जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज इन्स्टिट्यूटतर्फे येथील बसस्थानक स्वच्छ करण्यात आले.
---------
पाली बसस्थानक परिसराची स्वच्छता
नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
रत्नागिरी, ता. २ः तालुक्यातील नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पाली बसस्थानक व परिसरात शनिवारी (ता. ८) स्वच्छता मोहीम राबविली.
या उपक्रमांतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या २०० विद्यार्थ्यांसह शिक्षकही या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण पाली बसस्थानक स्वच्छ करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तेथील प्लास्टिक उचलून परिसराची स्वच्छता केली. गवत काढले. सारा परिसर स्वच्छ केला. कचर्‍यासाठी नाणीजहून संस्थानचा ट्रॅक्टर आणला होता. मुलांनी गोळा केलेला सारा कचरा त्यात एकत्र करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. सुमारे तीन तासाहून अधिक वेळ विद्यार्थी आणि शिक्षक बसस्थानकाची स्वच्छता करत होते. स्वच्छतेनंतर विद्यार्थ्यांनी चांगले राष्ट्र घडवण्यासाठीची शपथ घेतली. याप्रसंगी पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, पालीचे स्थानक प्रमुख श्री. सावंत, शिक्षक विशाल माने, सूर्यदीप धनवडे, सूर्याजी होलमुखे, सूरज मांडेलकर, बाबुलाल सौदागर, लव सावंत, त्रिशा सुवारे, अक्षया शिगम, आरती तरस, पूजा ताम्हणकर उपस्थित होते.