राजापूर-सोलगाव शाळेची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-सोलगाव शाळेची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता
राजापूर-सोलगाव शाळेची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

राजापूर-सोलगाव शाळेची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

sakal_logo
By

54142

फोटो ओळी
-rat2p35.jpg-

राजापूर : शाळा परिसर स्वच्छ करताना शिक्षक आणि विद्यार्थी.

सोलगाव शाळेची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता
राजापूर ः विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या तालुक्यातील सोलगाव येथील आदर्श शाळा नं. २ येथील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी शाळा परिसराची स्वच्छता करीत महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी केली.
गांधीजींनी साऱ्यांना स्वच्छ-समृद्ध भारत निर्माण करण्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या संदेशाचा सोलगाव येथील शाळेतील विध्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी कृतीद्वारे आज अमल करीत महात्मा गांधी जयंती साजरी केली. विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, शिक्षकांच्या मदतीने शाळा परिसर स्वच्छ करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक दीपक धामापूरकर, उपशिक्षक श्री. मगदूम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण नांगरेकर, पुष्पमाला नांगरेकर, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.