कणकवली कॉलेजचे प्रहसन कलेमध्ये यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली कॉलेजचे
प्रहसन कलेमध्ये यश
कणकवली कॉलेजचे प्रहसन कलेमध्ये यश

कणकवली कॉलेजचे प्रहसन कलेमध्ये यश

sakal_logo
By

54192
कणकवली : विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, डॉ. राजश्री साळुंखे, प्रा. हरिभाऊ भिसे, विजयकुमार वळंजू आदी.

कणकवली कॉलेजचे
प्रहसन कलेमध्ये यश
कणकवली, ता.३ : मुंबई विद्यापीठाचा ५५ वा सांस्कृतिक युवा महोत्‍सव नुकताच मुंबई येथे पार पडला. यात कणकवली महाविद्यालयाने सादर केलेल्या प्रहसन (स्किट) या कला प्रकारात कांस्यपदक प्राप्त केले. कला प्रकारात शिवानी वर्दम, कांचन परुळेकर, विदिशा यादव, पूर्वजा सावंत, अमृता परब, लिझा जाधव आदी सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थ्यांचा कणकवली कॉलेजमध्ये सत्‍कार करण्यात आला. शिवाय मिमिक्री कलाप्रकारामध्ये विद्यापीठात यशस्वी ठरलेल्या रिद्धी मोरवेकर हिचाही सत्कार झाला. शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, पर्यवेक्षक मंगलदास कांबळे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. युवराज महालिंगे, प्रा. हरिभाऊ भिसे उपस्थित होते.