सावंतवाडीत रंगभरण स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत रंगभरण स्पर्धा
सावंतवाडीत रंगभरण स्पर्धा

सावंतवाडीत रंगभरण स्पर्धा

sakal_logo
By

54235
सावंतवाडी ः रंगभरण स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी बबन साळगावकर आदी.

सावंतवाडीत रंगभरण स्पर्धा
सावंतवाडी ः ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळ, भटवाडीतर्फे यंदाही पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला रंगभरण स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उद्‍घाटन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष स्पर्धेचे आयोजक कुणाल शृंगारे, संस्थापक अध्यक्ष दिलीप भालेकर, प्रदीप भालेकर, विजय सावंत, दीपक सावंत, राजा दळवी, माजी नगरसेविका दीपाली भालेकर, तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
.................
‘कुत्र्यांच्या नसबंदीसाठी निधी द्या’
सावंतवाडी ः शहरात भटक्या कुत्र्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नसबंदी मोहीम आवश्यक आहे. त्यासाठी ‘जिल्हा नियोजन’मधून तीस लाखांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, ‘‘भटक्या कुत्र्यांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. कायद्यानुसार त्यांना संरक्षण आहे; परंतु याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. कुत्रा चावल्यानंतर आवश्यक औषधे उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे नसबंदीची मोहीम राबविणे आवश्यक असून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या.’’