कर्मभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर
कर्मभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर

कर्मभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर

sakal_logo
By

54238
तळवडे : सभागृहाचे उद्‍घाटन करताना रंजना सावंत आदी.

कर्मभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर

रंजना सावंत ः तळवडे विद्यालयाच्या सभागृहाचे उद्‍घाटन

सावंतवाडी, ता. ३ ः जे कर्मभूमी विषयी सदोदित कृतज्ञ राहिले, त्यांच्या कार्यकर्तुत्वाला कधीही ओहोटी लागली नाही. कर्मभूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही छोटी संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. यापुढेही कर्मभूमीच्या सेवेसाठी मी नित्य कार्यरत राहीन, असे प्रतिपादन तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका रंजना सावंत यांनी केले.
तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल, तळवडे यांच्या ‘सिध्देश्वर रंगायतन’ या रंगमंचासमोरील सभागृहाच्या उद्‍घाटन प्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडेचे अध्यक्ष विष्णू उर्फ भाई पेडणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पेडणेकर, खजिनदार डॉ. भालचंद्र कांडरकर, संचालक अशोक वराडकर, सुरेश गावडे, रवींद्र परब, मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका अश्विनी कुलकर्णी, मीरा नाईक, तुषार वझरकर आदी उपस्थित होते.
पेडणेकरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. यावेळी सभागृहाच्या उभारणीसाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका सावंत, ज्येष्ठ शिक्षिका अश्विनी कुलकर्णी, मीरा नाईक यांच्या हस्ते सभागृहाचे उद्‍घाटन करण्यात आले. रवींद्र परब यांनी देणगीदारांचे आभार मानले. मुख्याध्यापक देसाई यांनी विद्यालयाला प्रगतीपथावर नेणाऱ्या संस्थापक अध्यक्ष (कै.) शंकर उर्फ काकासाहेब पेडणेकर, माजी अध्यक्ष (कै.) मधुकर उर्फ अण्णासाहेब बुगडे, निवृत्त पर्यवेक्षक (कै.) विजयानंद पाटकर यांच्या गतस्मृतींना उजाळा देत आर्थिक सहाय्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. किशोर नांदिवडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद आडेलकर यांनी सूत्रसंचालन केले. दयानंद बांगर यांनी आभार मानले.