घरडा फाउंडेशनची सामाजिक, शैक्षणिक कार्यात गरूडझेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरडा फाउंडेशनची सामाजिक, शैक्षणिक कार्यात गरूडझेप
घरडा फाउंडेशनची सामाजिक, शैक्षणिक कार्यात गरूडझेप

घरडा फाउंडेशनची सामाजिक, शैक्षणिक कार्यात गरूडझेप

sakal_logo
By

rat३p६.jpg-
५४२५७
डॉ. के. एच. घरडा
---------------
घरडा फाउंडेशनची सामाजिक, शैक्षणिक कार्यात गरूडझेप

डॉ. के. एच. घरडा हे रासायनिक शास्त्रज्ञ. रसायनातील अफाट ज्ञान संशोधन आणि कार्यपूर्तीच्या उद्देशाने डॉ. घरडा यांनी लोटे एमआयडीसीत घरडा केमिकल हा रासायनिक कारखाना उभारत अल्पावधीतच यश मिळवत जागतिक दर्जाची उत्पादने निर्माण केली. रासायनिक संशोधनासाठी संशोधन केंद्र विकसित करतानाच सुरवात झाली ती यशाच्या शिखरावर जाण्याची. डॉ. घरडा यांच्यावर त्याची आई आणि भगवतगीतेचा मोठा प्रभाव. यातूनच त्यांनी रासायनिक विकासाबरोबर सामाजिक विकासासाठी घरडा फाउंडेशन ही स्वयं विकासातून ग्राम विकासाचे ध्येय ठरवत १९९६ मध्ये ही संस्था स्थापन केली. या संस्थेविषयी थोडक्यात....
-----------

घरडा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून मुंबई, गुजरात तसेच रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक विकासाची कामे केली जातात. शैक्षणिक, शेती, उत्पन्नवृद्धी, पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबवले जातात. डॉ. घरडा यांनी औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेत भारत सरकराने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. आरोग्य सुविधेसाठी त्यांनी सुसज्ज घरडा हॉस्पिटल सुरू केले. कोकणातील गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी खेड तालुक्यातील लवेल येथे घरडा फाउंडेशन संचलित घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे अभियांत्रिकी महाविद्यालय २००७ मध्ये सुरू केले. या महाविद्यालयास स्थापनेपासूनच विशेष अतिथी, शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञांचा सहवास लाभला.
डॉ. घरडा यांचे स्नेही व जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ही घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एक दिवस ग्लोबल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून ओळखली जाईल, असे सांगितले होते. महाविद्यालयाची तशी वाटचाल सुरू असून त्याची प्रचिती आता येते आहे. या महाविद्यालयात मेकॅनिकल, केमिकल, कॉम्प्युटर, सिव्हील आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन सहीत संगणकीय आर्टीफीशल इंजिनिअरिंग अशा सहा शाखा असून एक हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाच्या सेवा सुविधा आहेत. सर्व सोयीनियुक्त सुमारे ७५० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह आणि उत्तम खानावळ आहे. वसतिगृह परिसरात गृहपयोगी वस्तू भांडारही उपलब्ध आहे. सुमारे ७५ प्राध्यापक आणि कर्मचारी महाविद्यालयाच्या परिसरातील निवास संकुलात राहतात. महाविद्यालयासह वसतिगृह आणि निवास संकुलात वायफाय सुविधा आहे.
जीआयटीमार्फत विद्यार्थ्याच्या तांत्रिक कला व कौशल्यांना व्यासपीठ निर्माण करण्याच्या हेतूने प्रतीवर्षी शोध हा उपक्रम आणि परिसंवाद पेपर प्रेझेन्टेशन आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात. यावेळी दिग्गज शिक्षणतज्ज्ञ आणि तंत्रज्ज्ञ यांनी भेट देवून विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले आहे. महाविद्यालयाने २०१२ मध्ये राष्ट्रीय अभियांत्रिकी महापरिषद घेतली. या महाविद्यालयातील विद्यार्थी सद्यस्थितीत भारतातील नामांकित कंपनीमध्ये काम करत आहेत. जीआयटी ही शैक्षणिक संस्था डॉ. घरडा यांच्या प्ररणेने व मार्गदर्शनाखाली प्रगल्भ होत असल्याने येथील विद्यार्थ्यांना घरडा कंपनीसह विनती ऑर्गेनिक सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी दिल्या. काही विद्यार्थी विप्रो, इन्फोसिस, टीसीएस, कॅपजेमिनी, असेंसिअर आदी नामांकित कंपन्यांत नोकरी करतात.
संस्थेचा लौकिक वाढण्यासाठी व दर्जेदार गुणवत्तापूर्वक शिक्षणसाठी प्राध्यापक, कर्मचारी योगदान देतात. संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. घरडा आणि सचिव नीलेश कुळकर्णी, विश्वस्त सतीश वेंगुली, संस्था प्रतिनिधी सतीश शेणॉय, जे. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्राचार्य डॉ. सचिन पाटील, सर्व विभागप्रमुख व सर्व सहकारी मेहनत घेत आहेत.