जिल्ह्यात राजरोस अवैध दारू वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात राजरोस अवैध दारू वाहतूक
जिल्ह्यात राजरोस अवैध दारू वाहतूक

जिल्ह्यात राजरोस अवैध दारू वाहतूक

sakal_logo
By

54269.
मंदार नाईक

जिल्ह्यात राजरोस अवैध दारू वाहतूक

मंदार नाईक ः आळा न घातल्यास आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीला त्वरित आळा घालावा; अन्यथा या विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १२ ला रोजी सकाळी ११ वाजता इन्सुली चेकपोस्ट कार्यालयासमोर ''डबे वाजवा'' आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे मळेवाड विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांनी दिला आहे.
गोवा राज्यातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरट्या दारूची अवैध वाहतूक होत आहे. चेकपोस्ट असतानाही दारू मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात व राज्यात येत आहे. यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. व्यसन पूर्ण करायला पैसा कमी पडल्यास त्यांच्याकडून चोरी, मारामारी यासारखे मार्ग अवलंबून आपल्या जीवनाची वाताहत केली जात आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे उदध्वस्त होत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी चोरट्या वाहतुकीला त्वरित आळा घालावा, अशी मागणी मंदार नाईक यांनी केली आहे. कोल्हापूरवरून येणारी तपासणी पथके सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करतात; पण सिंधुदुर्गातील पथक मात्र देखाव्यासाठी कधीतरी कारवाई करून पुन्हा त्या विषयात लक्ष घालत नाही. जिल्ह्यात येणारी गोवा बनावटीची दारू सातार्डा, आरोंदा, बांदा या ठिकाणची चेक पोस्ट पार करून होते. या अवैध व्यवसायामुळे जिल्ह्याचे नाव बदनाम होत असून त्याला त्वरित आळा घालावा, अशी मागणी नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.