परवान्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र अनिवार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परवान्यासाठी भोगवटा
प्रमाणपत्र अनिवार्य
परवान्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र अनिवार्य

परवान्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र अनिवार्य

sakal_logo
By

परवान्यासाठी भोगवटा
प्रमाणपत्र अनिवार्य
कणकवली, ता. ३ ः महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या माध्यमातून नवीन व्यवसाय परवाना मिळण्यासाठी परिपूर्ण अर्जांसोबत आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्याचा शासन निर्णय आहे; मात्र अवैध बांधकाम असलेल्या अथवा व्यावसायिक वापराचे भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या मालमत्तेवर व्यवसाय परवाना दिला जाणार नाही. याबाबतची जबाबदारी आयुक्त, मुख्याधिकारी तसेच संबंधित जबाबदार अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांची असणार आहे. व्यवसाय परवाना मिळण्यासाठी ओळखपत्र, भाडेकरारनामा किंवा वैध भोगवटा प्रमाणपत्र हे कागद असणे आवश्यक आहेत. अर्जदाराकडे स्थानिक स्वराज्य संस्थेची थकबाकी असल्यास ती भरण्याबाबत सूचना देण्यात यावी; मात्र या कारणामुळे अर्ज नाकारण्यात येऊ नयेत. व्यवसाय परवान्यासाठी अर्ज केलेल्या मालमत्तेकरिता वैध बांधकाम परवाना व व्यावसायिक वापराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे का, याबाबत संबंधित अधिकाऱ्याने या कागदपत्रांची सत्यता पडताळून व्यवसाय परवाना द्यावा, असे निर्देश आहेत.