मुणगेत नळ योजनेचे काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुणगेत नळ योजनेचे काम
मुणगेत नळ योजनेचे काम

मुणगेत नळ योजनेचे काम

sakal_logo
By

54305
मुणगे ः आडबंदर येथील नळपाणी योजनेच्या स्वतंत्र टाकीच्या कामाचा प्रारंभ करताना प्रणय महाजन. सोबत सरपंच साक्षी गुरव, उपसरपंच धर्माजी आडकर आदी. (छायाचित्र ः विश्वास मुणगेकर)

मुणगेत नळ योजनेचे काम
मुणगे ः येथील आडबंदर नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ जमीन मालक तथा (कै.) वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसचे प्रा. प्रणम महाजन यांच्या हस्ते झाला. या योजनेंतर्गत आडबंदर, कारिवणेवाडी आणि आपईवाडी या वाड्यांसाठी ‘जलजीवन मिशन’अंतर्गत स्वतंत्र टाकी बसवून त्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या नवीन टाकीसाठी प्रा. महाजन यांनी विनामोबदला जमीन दिली. यावेळी मुणगे सरपंच साक्षी गुरव, उपसरपंच धर्माजी आडकर, ग्रामपंचायत सदस्य रविना मालडकर, निकिता कांदळगावकर, प्रमोद सावंत, संजय घाडी, पाणी समिती सदस्य गोविंद सावंत, तुषार आडकर, मक्तेदार अनिल कोरगावकर आदी उपस्थित होते.
................
54306
फणसगाव ः रानभाज्या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद. (छायाचित्र : एन. पावसकर)

फणसगावला रानभाज्यांचे प्रदर्शन
तळेरे : देवगड तालुक्यातील फणसगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रानभाज्या प्रदर्शन झाले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्या मांडल्या होत्या. आपल्या परिसरातील विविध रानभाज्यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला. अळू, शेवगा, रताळी, टाकला, डेडर, सुरण, तांदळी, हळद, भारंगी, कवळा, कुर्डू, पोकळा, माठ, काटलं, केळफूल, करांदा, कारले, भोपळा, तीळ, मायाळू चूच, नारळ आदी भाज्यांचा यात समावेश होता. ‘‘भाजी हा अन्नघटकातील अत्यावश्यक घटक नियमित आहारात समाविष्ट करून आपले जेवण सात्विक गुणांनी परिपूर्ण असावे,’’ अशी माहिती मुख्याध्यापिका पूजा कोरेगावकर यांनी दिली. ज्येष्ठ शिक्षिका वर्षदा करंदीकर यांनी मार्गदर्शन केले.