साडवली-प्रमोद जठारांची एक लाखाची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-प्रमोद जठारांची एक लाखाची मदत
साडवली-प्रमोद जठारांची एक लाखाची मदत

साडवली-प्रमोद जठारांची एक लाखाची मदत

sakal_logo
By

कोळंबेतील गुरुकुलास
जठारांकडून एक लाख
साडवली, ता. ३ : कोळंबे विद्या प्रसारक मंडळाच्या गुरुकुल वसतिगृह सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कार्यक्रमाचा समाप्ती समारोह झाला.
भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत विद्यार्थ्यांनी स्वागत केले. ग्रंथप्रदर्शन व त्यानंतर मोदींच्या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन झाले. संस्थेचे अध्यक्ष नयन मुळ्ये यांनी आपण सर्वच मोदी सरकारच्या योजनांचे लाभार्थी आहोत याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून मोदीजींचे कार्य विषद केले. प्रमोद जठार यांनी शाळेत नव्याने सुरू झालेल्या वसतिगृहास तत्काळ एक लाख रुपयांची मदत देऊ केली, तर १० संगणक संच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.