महात्मा गांधींचे विचार आत्मसात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा गांधींचे विचार आत्मसात करा
महात्मा गांधींचे विचार आत्मसात करा

महात्मा गांधींचे विचार आत्मसात करा

sakal_logo
By

54317
बांदा ः गोगटे वाळके महाविद्यालयात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. किशोर म्हेत्री.

महात्मा गांधींचे विचार आत्मसात करा

डॉ. किशोर म्हेत्री ः बांदा महाविद्यालयात गांधी, शास्त्रींना अभिवादन

बांदा, ता. ३ ः महात्मा गांधी यांनी आफ्रिकेत वर्णद्वेषाच्या विरोधात आंदोलन सुरू केले. भारतात आल्यानंतर स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. कोणतेही शस्त्र हाती न घेता अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिश शासनाविरोधात आंदोलन उभे केले. त्यांनी केलेल्या विविध आंदोलनांमुळेच देश स्वतंत्र झाला. या महान नेत्यांची केवळ जयंती साजरी न करता आजच्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करावेत, असे प्रतिपादन येथील गोगटे वाळके महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. किशोर म्हेत्री यांनी केले. या वेळी त्यांनी माजी पंतप्रधानलाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचाही आढावा घेतला.
येथील गोगटे वाळके महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंती दिनी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर होते.
महात्मा गांधी हे सत्यनिष्ठ होते. त्यांची स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना आजही महत्त्वपूर्ण ठरते. आज केवळ भारतालाच नाही, तर संपूर्ण जगाला गांधीच्या विचारांशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन डॉ. काजरेकर यांनी केले. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर यांनी माजी पंतप्रधानलाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. पी. वेल्हाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रमाकांत गावडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एम. एन वालावलकर यांनी आभार मानले.