राजापूर-37 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-37 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात
राजापूर-37 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात

राजापूर-37 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात

sakal_logo
By

बातमी क्र. २२ (पान २ साठी)

सदतीस जागांसाठी
६० उमेदवार रिंगणात
राजापूर तालुका; पाच ग्रामपंचायती बिनविरोध
राजापूर, ता. ३ : तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्धारित कालावधीमध्ये सरपंचपदासाठीचे सहा आणि सदस्यपदाचे बारा अशा १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता प्रत्यक्षात ३७ जागांसाठी ६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दहापैकी देवाचेगोठणे, वडदहसोळ, केळवली, मूर, मोगरे या ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत.

तालुक्यातील सागवे, देवाचे गोठणे, केळवली, मूर, आंगले, वडदहसोळ, राजवाडी, कोंड्येतर्फे सौंदळ, मोगरे आणि भालावली अशा दहा ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत आहेत. त्यासाठी पुढील महिन्यामध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी निर्धारित कालावधीमध्ये त्यापैकी १२ सदस्यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ३७ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यांच्यामध्ये आता प्रत्यक्ष लढती होत असून त्यांच्या प्रचाराने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.