तायक्वाँदोत हर्षदा पार्टेला कांस्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तायक्वाँदोत हर्षदा पार्टेला कांस्य
तायक्वाँदोत हर्षदा पार्टेला कांस्य

तायक्वाँदोत हर्षदा पार्टेला कांस्य

sakal_logo
By

rat3p17.jpg-
L54348
खेड ः कास्यपदक विजेत्या हर्षदा पार्टे यांना सन्मानित करताना मान्यवर.
-----------
तायक्वाँदोत हर्षदा पार्टेला कांस्य
खेडः मुंबई विद्यापीठ स्तरावर मुंबई-माटुंगा येथे खालसा महाविद्यालयात घेतलेल्या तायक्वाँदो स्पर्धेच्या अंतिम फेरीत आयसीएस महाविद्यालयातील हर्षदा पार्टेने कास्यपदक पटकावले. यापूर्वी तिने रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झालेल्या कोकण विभागीय स्तरावरील तायक्वाँदो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते. जिल्हा क्रीडा प्रशिक्षक प्रशांत कांबळे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष हिराचंद बुटाला यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
------------
rat3p18.jpg
54349
खेडः विजेत्यास गौरविताना संदीप नायकवडी.

भोंडला स्पर्धेत सागवेकर प्रथम
खेडः येथील रोटरी क्लब व श्री देवी पाथरजाई महिला मंडळाच्या वतीने श्री देवी पाथरजाई मंदिरात आयोजित भोंडला स्पर्धेत दीक्षा सागवेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. येथील आपला बाझार पुरस्कृत स्पर्धेस महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत साक्षी पाटणे द्वितीय, आर्या कवळे यांना तृतीय क्रमांक मिळाला. मनीषा कानडे, देवरुकर, रुची आंबुर्ले, अधिरा गोंदकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. त्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले. आपला बाजारचे संदीप नायकवडी, संध्या नायकवडी, शिल्पा पाटणे, रोटरी क्लबचे संकेत बुटाला यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
------------
rat3p19.jpg
54350
खेडः अपूर्वा शिंदे यांचा सत्कार करताना परिट समाजाच्या महिला पदाधिकारी.

परीट समाज उपाध्यक्षपदी अपूर्वा शिंदे
खेड ः जिल्हा परीट समाजाच्या महिला उपाध्यक्षपदी येथील अपूर्वा शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल संचिता शिंदे, आरोही शिंदे, अलका शिंदे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.