काजू बी प्रक्रियेचे कंत्राट जिल्ह्यात मिळण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काजू बी प्रक्रियेचे कंत्राट जिल्ह्यात मिळण्याची शक्यता
काजू बी प्रक्रियेचे कंत्राट जिल्ह्यात मिळण्याची शक्यता

काजू बी प्रक्रियेचे कंत्राट जिल्ह्यात मिळण्याची शक्यता

sakal_logo
By

rat३p१४.jpg
५४३१०
रत्नागिरीः परांजपे अ‍ॅग्रो कंपनीत आयोजित काजू प्रक्रियाधारकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ॠषिकेश परांजपे.
------------
काजू बी प्रक्रियेचे कंत्राट जिल्ह्यास
संघ, परांजपे कॅश्‍यूकडून ५० प्रक्रियाधारकांची नोंदणी; नऊ लाख मेट्रीक टन बी आयात
रत्नागिरी, ता. ३ः यंदा भारतात नऊ लाख मेट्रीक टन काजू बी आयात झाली आहे. त्यातील प्रतिदिन ३० ते ४० टन काजू बी प्रक्रियेचे कंत्राट रत्नागिरी जिल्ह्यातील प्रक्रिया धारकांना मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी ५० प्रक्रियाधारकांची नोंदणी जिल्हा काजू प्रक्रियाधारक संघ आणि परांजपे कॅश्यू यांच्यावतीने करण्यात आली. प्रक्रियेतील दर्जा राखणे आणि अन्य नियोजनासाठीची जबाबदारी ॠषीकेश परांजपे आणि विवेक बारगिर यांच्याकडे दिली आहे.
मिरजोळे एमआयडीसीतील परांजपे अ‍ॅग्रो प्रोडक्टस्मध्ये सोमवारी (ता. २) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पणनचे मिलिंद जोशी, जिल्हा उद्योग केंद्राच्या विदया कुलकर्णी, संतोष पेडणेकर, ॠषीकेश परांजपे, विवेक बारगिर, गव्हाणेचे जयवंत विचारे, संदेश दळवी यांच्यासह पन्नासहून अधिक काजू प्रक्रियाधारक उपस्थित होते. जॉबवर्क करण्यासाठी इच्छुक काजू प्रक्रियाधारकांकडून माहिती संकलित करण्यात आली. याप्रसंगी बारगिरी यांनी कर्ज पुनर्गठनासाठी माजी खासदार निलेश राणेंच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात बँकांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच पालकमंत्री उदय सामंतही काजू उद्योजकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पणनचे अधिकारी मिलिंद जोशी यांनी काजू बी च्या बाजारपेठेतील सद्यःस्थिती यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मागील तिन महिन्यात ९ लाख मेट्रीक टन काजू बी विविध देशातून आयात झाली आहे. मेंगलोर, न्हावा शेवा आणि तामिळनाडू येथील बंदरात ही काजू बी आली आहे. त्यावर प्रक्रिया कशी होणार हा मोठा प्रश्‍न आहे. त्याचे काम विविध प्रक्रिया करुन देणार्‍यांना मिळू शकते. खर्च वजा जाता किलोमागे पाच रुपये कमवण्याची संधी मिळवता येणार आहे. याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कोणत्या योजना राबविल्या जातात यावर विदया कुलकर्णी यांनी माहिती दिली. प्रशिक्षीत कर्मचारी वर्ग असेल तर प्रक्रिया धारकांची क्षमता वाढेल. तसेच राष्ट्रीय बँकाही पुनर्गठनासाठी संबंधित प्रक्रिया कंपनीला प्राधान्य देऊ शकतात.
----
चौकट
कर्ज व्यवहारासाठी नियमित काम महत्त्वाचे

जिल्ह्यात छोटी-छोटी प्रकिया युनिट आहेत. त्यांना प्रक्रियेची कामे मिळत नाहीत. बँकांकडून पुनर्गठन करुन मिळाले तरीही हप्ता भरण्यासाठी नियमित कर्ज व्यवहार होणे आवश्यक आहे. ते परराज्यात आलेली काजू बी प्रक्रियेसाठी मिळाली तर शक्य आहे. ती काजू बी जिल्ह्यातील प्रक्रिया केंद्रांपर्यंत पोचवणे, दर्जा राखला पाहीजे, असे ॠषिकेश परांजपे यांनी सांगितले. तसेच प्रत्येक काजू प्रक्रिया धारकाकडून माहिती घेण्यात आली आहे. त्यात प्रक्रियेची क्षमता, कर्जाची स्थिती, प्रशिक्षित कर्मचारी याचा समावेश आहे.