जिल्ह्यात पुन्हा धाकधपटशहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात पुन्हा धाकधपटशहा
जिल्ह्यात पुन्हा धाकधपटशहा

जिल्ह्यात पुन्हा धाकधपटशहा

sakal_logo
By

54364
अतुल रावराणे

जिल्ह्यात पुन्हा धाकधपटशहा

अतुल रावराणे ः सत्तातरानंतरची स्थिती, विकासावर विपरीत परिणाम, पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २ ः राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अधिकाऱ्यांवर दडपशाहीच्या प्रवृत्तींना आळा बसला होता; परंतु राज्यातील सत्तातरानंतर आता पुन्हा या प्रवृत्ती डोके वर काढत आहेत. अधिकाऱ्यांना घरी बोलावून धमकावत असल्याचा आरोप करून त्याचा परिणाम अधिकाऱ्यांच्या मनोबलावर होणार आहे. याचा विपरित परिणाम जिल्ह्याच्या विकासावर होणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधणार असून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी करणार असल्याची माहिती शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी येथे केली.
येथील शासकीय विश्रामगृहावर रावराणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, लक्ष्मण रावराणे, संदीप सरवणकर, रवींद्र रावराणे, रणजित तावडे, सुनील रावराणे, शिवाजी राणे, स्वप्नील रावराणे आदी उपस्थित होते.
यावेळी रावराणे म्हणाले, ‘‘जिल्ह्याची सत्ता पूर्वी एकाच नेत्याकडे असताना सर्व अधिकारी नेहमी मानसिक दडपणाखाली असायचे. राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर अशा प्रवृत्तींना रोखण्याचे काम करण्यात आले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राडा, धाकधपटशहा करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्याचे काम सरकारने केले; परंतु आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. विकासकामांचा आढावा शासकीय कार्यालयात न घेता ते आपल्या घरी घेत आहेत. आता आमची सत्ता आली आहे, हे सांगत ते अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा पद्धतीने धमकावण्याचे प्रकार सुरू राहिले तर चांगले अधिकारी जिल्ह्यात थांबणार नाहीत. अधिकाऱ्यांशी दादागिरी करण्याची त्यांना पूर्वीपासून सवय आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांनी अनेकदा त्यांचा उल्लेख आपल्या भाषणातून काही वर्षांपूर्वी केलेला आहे. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने पाहावे आणि अधिकाऱ्यांचे मनोबल खचेल, अशा प्रकारांना थारा देऊ नये.’’ मंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपाला प्रथमच पालकमंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे भाजपाच्या निष्ठावन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे; परंतु राणे समर्थकांमध्ये तो उत्साह दिसून येत नाही. राणेंनी भाजपात प्रवेश केल्यापासून नवे-जुने असे गट सक्रीय असल्याची टीका देखील त्यांनी केली.
..............
चौकट
निष्ठावंत शिवसैनिक शिवतीर्थावरच
कुणी काहीही चर्चा करीत असले तरी शिवसेनेचा दसरा मेळावा दणक्यात होणार आहे. निष्ठावंत शिवसैनिक शिवतीर्थावरच येणार आहेत. जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत, असे रावराणे यांनी स्पष्ट केले.
..............
चौकट
कुणीही शिंदेगटात प्रवेश करणार नाही
सिंधुदुर्गातील शिवसैनिक कडवट आहे. तो बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असून कधीही शिंदे गटात जाणार नाही. काही मोजक्या लोकांनी प्रवेश केला ते वाळू, खडीत अडकलेले होते, असा टोला रावराणे यांनी लगावला.