नावीन्यपूर्ण विकासकामांचा आराखड्यात समावेश करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नावीन्यपूर्ण विकासकामांचा 
आराखड्यात समावेश करा
नावीन्यपूर्ण विकासकामांचा आराखड्यात समावेश करा

नावीन्यपूर्ण विकासकामांचा आराखड्यात समावेश करा

sakal_logo
By

54367
देवगड ः येथे मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर. शेजारी विनायक ठाकूर.


नावीन्यपूर्ण विकासकामांचा
आराखड्यात समावेश करा

सीईओ नायर ः कुणकेश्‍वरमध्ये मार्गदर्शन

देवगड, ता. ३ ः ग्रामपंचायतीचा विकास आराखडा म्हणजे गाव विकासाचा आरसा असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी कुणकेश्‍वर (ता.देवगड) येथे व्यक्त केले. गावविकासामध्ये नावीन्यपूर्ण विकासकामांचा समावेश करण्याचे त्यांनी यावेळी सुचित केले.
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद आयोजित कुणकेश्वर येथे ‘आमचा गाव आमचा विकास’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याबाबतच्या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना श्री. नायर बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) विशाल तनपुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) विनायक ठाकूर, प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी पंढरीनाथ फाले, विस्तार अधिकारी महादेव शिंगाडे, विस्तार अधिकारी नीलेश जगताप, विस्तार अधिकारी अंकुश जंगले, ग्रामविकास अधिकारी नारायण माणगावकर, ग्रामपंचायत विभाग लेखापाल सरोजिनी गुराम, सारिका पावसकर, ग्रामविकास अधिकारी रामदास हडपीडकर, कुणकेश्वर ग्रामसेवक मनीष टकले आदी उपस्थित होते. श्री. नायर यांनी, ग्रामपंचायत विकास आराखडा विकासाचा आरसा असून त्याचे योग्य मार्गदर्शन घेऊन गावपातळीवर विकास आराखडे करण्यासाठी हे महत्त्वाचे प्रशिक्षण आहे. चांगल्या ठिकाणी चर्चा व संवाद प्रशिक्षणातून एकमेकांचे मुद्दे तसेच अनुभव देवाणघेवाण केल्याने महत्त्वाच्या बाबींवर अभ्यास करून आराखड्यामध्ये वैविधता आणणे शक्य होते, असे सांगितले. या प्रशिक्षणामध्ये सिंधुदुर्गातील प्रभारी अधिकारी उपस्थित होते. प्रभारी अधिकारी व पर्यवेक्षकांचे चार दिवसांचे प्रशिक्षण झाले. कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले.