रत्नागिरी-बेपत्ता विवाहितेचा मृतदेह कपल पॉइंटला दरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-बेपत्ता विवाहितेचा मृतदेह कपल पॉइंटला दरीत
रत्नागिरी-बेपत्ता विवाहितेचा मृतदेह कपल पॉइंटला दरीत

रत्नागिरी-बेपत्ता विवाहितेचा मृतदेह कपल पॉइंटला दरीत

sakal_logo
By

५४३८४
५४३८७

बेपत्ता विवाहितेचा मृतदेह कपल पॉइंटला दरीत
घातपाताचा संशय; दोघा संशयितांना चौकशीसाठी घेतले ताब्यात
रत्नागिरी, ता. ३ : शहरातील खालचा फगरवठार येथून बेपत्ता ३३ वर्षीय विवाहितेचा मृतदेह भगवती किल्ल्यासमोरील कपल पॉइंट येथे २०० फूट खोल दरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह छिन्नविछिन्न आणि सडला आहे. मंगळसूत्र आणि पैंजणावरून नातेवाईकांनी तो ओळखला. विवाहितेने आत्महत्या केली की घातपात झाला याचा शोध शहर पोलिसांनी सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत विवाहितेचा मृतदेह रॅपलिंग करणाऱ्यांच्या साह्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र ते शक्य नसल्याने पोलिसांनी खाली उतरून समुद्र किनाऱ्यारून घटनास्थळी जाऊन गोणीत भरून बाहेर काढला. दरम्यान, घातपाताच्या शक्यतेने या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.
रितेश घाणेकर (खालचा फगरवठार) यांनी या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांची पत्नी तन्वी घाणेकर (वय ३३) ही २९ सप्टेंबरला सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास बाजारात जाऊन येते, उशिर झाला तर जेवण करून घ्या, असे मुलगी आनंदी हिला सांगून दुचाकी (एमएच ०८ एक्स ७११६) घेऊन बाजारात गेल्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्या घरी न आल्याने पती रितेश यांनी ३० सप्टेंबरला शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कालपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. तन्वी घाणेकर यांची दुचाकी भगवती किल्ल्यानजीक दोन दिवसांपूर्वी आढळली. त्यानंतर शहर पोलिसांनी त्या परिसरात शोधमोहीम आती घेतली; परंतु पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
सोमवार सकाळपासूनच भगवती किल्ला, कपल पॉईंट, टकमक पॉईंट, लाईट हाऊस परिसरात समुद्राच्या बाजूने शोध सुरू करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांनी दिल्या. दुपारी चार वाजता किल्ल्यासमोरील कपल पॉईंट येथे दुर्गंधी येऊ लागल्याने सुमारे २०० फूट खोल दरीमध्ये जाऊन शोध घेतला. तेव्हा एका महिलेचा मृतदेह त्यांना आढळला. मृतदेह तेथून बाहेर येण्यासाठी मार्ग नसल्याने पोलिसांनी सायंकाळी माउंटनर्स असोसिएशन रत्नागिरीच्या रॅपलिंग टीमला पाचारण केले. त्यानंतर रोपच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यासाठी नियोजन केले; परंतु अंधार पडल्यामुळे २०० फूट खोलवरचा अन सडलेला मृतदेह वर काढणे कठीण होते. अखेर निरीक्षक चौधरी यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले, उपनिरीक्षक महाले सहकाऱ्यांसह समुद्र किनाऱ्यावर खाली उतरून पायवाटेने घटनास्थळी पोहोचले. मृतदेह प्लास्टिक बॅगेत भरून स्ट्रेचरवरून बाहेर काढला. तो विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला. ही नेमकी आत्महत्या आहे, की घातपात याबाबत पोलिस तपास करीत आहेत. आत्महत्या असेल तर त्याच्यामागे एवढे गंभीर कारण या होते, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते.


नातेवाइकांनी टाहो फोडला
मृतदेह बाहेर काढल्यानंतर तेथे आलेल्या नातेवाइकांनी टाहो फोडला. नातेवाईक एकमेकाला आधार देत होते; परंतु हुंदके आवरत नव्हते. नवरात्रोत्सवानिमित्त भगवती देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होती. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर तेथे मोठी गर्दी झाली; परंतु वाहतूक पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळले. नातेवाईकही अन्य वाहनातून पोलिसांबरोबर निघून गेले.