रावराणे मंडळाची कार्यकारिणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रावराणे मंडळाची कार्यकारिणी
रावराणे मंडळाची कार्यकारिणी

रावराणे मंडळाची कार्यकारिणी

sakal_logo
By

54394
मुंबई ः नवीन कार्यकारिणीतील पदाधिकारी.

रावराणे मंडळाची कार्यकारिणी
वैभववाडी ः रावराणे मंडळाची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली असून अध्यक्षपदी गणपत रावराणे, तर सरचिटणीसपदी सुबोध रावराणे यांची निवड झाली आहे. मंडळाची बैठक मुंबई-चिंचपोकळी येथील विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या सभागृहात काल (ता. २) झाली. या बैठकीला २५ पैकी २४ सदस्य उपस्थित होते. बैठकीत नवीन कार्यकारिणी गठित करण्याविषयी चर्चा झाली. त्यानुसार अध्यक्षपदी गणपत रावराणे, तर सरचिटणीसपदी सुबोध रावराणे यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून सदानंद रावराणे, शैलेंद्र रावराणे, कार्याध्यक्ष प्रभानंद रावराणे, खजिनदार मोहन रावराणे, सहचिटणीस सत्यवान रावराणे, जयसिंग रावराणे यांची निवड झाली. सदस्य म्हणून प्रताप रावराणे, उदय रावराणे, ज्ञानेश्वर रावराणे, मिलिंद रावराणे, संजय रावराणे, संतोष रावराणे, सागर रावराणे, महेश रावराणे, श्रीधर रावराणे, राकेश रावराणे, महेश रावराणे, प्रभाकर रावराणे, विनायक रावराणे, विजय रावराणे, विक्रम रावराणे, अर्जुन रावराणे, सुरेश रावराणे यांची निवड झाली.
..............
54395
कामळेवीर ः ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेतील सहभागी महिलांसह कार्यकर्ते.

सोनाली वराडकरांना पैठणी
सावंतवाडी ः कामळेवीर येथील रणझुंजार धुरीवाडा मित्रमंडळातर्फे आयोजित ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात सोनाली वराडकर प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. दीक्षा मांजरेकर द्वितीय, तर माधुरी धुरी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. नवरात्रोत्सवानिमित्त हा कार्यक्रम झाला. यावेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुधीर धुरी, समीर कुडाळकर, अर्चना घारे-परब, तात्या कोंडस्कर, चित्रा देशपांडे, संतोष पेडणेकर, रामचंद्र मांजरेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण यशवंत धुरी, सतीश मांजरेकर यांनी केले.