पान एक-मोटार-दुचाकी धडकेत दोघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-मोटार-दुचाकी धडकेत दोघे जखमी
पान एक-मोटार-दुचाकी धडकेत दोघे जखमी

पान एक-मोटार-दुचाकी धडकेत दोघे जखमी

sakal_logo
By

swt336.txt
बातमी क्र.36
(बातमी कृपया वाचावी)

पान एक

टीपः swt339.jpg मध्ये फोटो आहे.

कणकवली ः येथील जानवली पुलावर मोटारीची दुचाकीला समोरासमोर धडक बसून झालेले वाहनांचे नुकसान.

मोटार-दुचाकी धडकेत दोघे जखमी
कणकवलीजवळ घटना; महामार्गावर बेशिस्त वाहतूक
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३ ः मोटार व दुचाकीची धडक होऊन तरुण-तरुणी जखमी झाले. ही घटना आज दुपारी महामार्गावरील जानवली पुलावर घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र या अपघाताची खबर उशिरापर्यंत पोलिसांत देण्यात आली नव्हती. एकेरी मार्गावर बेशिस्तीने केलेल्या वाहतुकीमुळे हा अपघात घडल्याची चर्चा आहे.
याबाबत माहिती अशी ः संबंधित तरुण दुचाकीने उड्डाण पुलावरून कणकवलीच्या दिशेने येत होता. तो वैभववाडीतील रहिवासी आहे. त्याच्यासोबत दुचाकीवर एक तरुणी होती. जानवली नदीवरील पुलापुढे असलेल्या उड्डाण पुलावर त्यांची दुचाकी पोहोचली. त्यावेळी समोरून मोटार येत होती. मोटार पुलाच्या एकेरी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने आल्याने दुचाकी चालकाला गाडीचा वेग आवरता आला नाही. परिणामी दोन्ही वाहने समोरासमोर जोरदार धडकली.
यात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ती तरुणीही जखमी झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती समजताच कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, पोलिस नाईक पांडुरंग पांढरे आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. अपघाताची घटना नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत कणकवली पोलिस ठाण्यात सुरू होती.


एकेरी मार्गासह
बेशिस्तीचा फटका
कणकवली शहराच्या उड्डाण पुलाखाली पर्यायी रस्ते आहेत; पण मुख्य चौकापासून एस. एम. हायस्कूलपर्यंत पूल आहे. पुढे बॅाक्सवेल आहे. या परिसरात दोन ठिकाणी सब-वे आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालक एकेरी मार्गावर उलट्या दिशेने वाहने चालवण्यासाठी प्रयत्न करतात. परिणामी अशा अपघाताच्या घटना घडत आहेत.