सावंतवाडी-आंबोली- कोल्हापूर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी-आंबोली- कोल्हापूर 
रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
सावंतवाडी-आंबोली- कोल्हापूर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

सावंतवाडी-आंबोली- कोल्हापूर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

sakal_logo
By

सावंतवाडी-आंबोली- कोल्हापूर
रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
सावंतवाडी, ता. 3 ः सावंतवाडी आंबोली मार्गे कोल्हापूर हा रस्ता पूर्णतः नादुरुस्त झाला असून ह्या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केली आहे. सावंतवाडी आंबोली मार्गे कोल्हापूर या रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना वाहतूक करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. भाजप शहराध्यक्ष गोंदावळे यांनी याची दखल घेत तातडीने जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण व कोल्हापूरचे पालकमंत्री केसरकर यांचे रस्ता दुरुस्तीबाबत लक्ष वेधल आहे.