श्रावणी परब ठरल्या पैठणीच्या मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावणी परब ठरल्या पैठणीच्या मानकरी
श्रावणी परब ठरल्या पैठणीच्या मानकरी

श्रावणी परब ठरल्या पैठणीच्या मानकरी

sakal_logo
By

swt43.jpg
54460
मडुराः विजेत्या श्रावणी परब यांना पैठणी प्रदान करताना संजना परब. सोबत संजू परब, हेमंत मराठे, तेजश्री परब व अन्य.

श्रावणी परब ठरल्या
पैठणीच्या मानकरी
बांदा, ता. ६ः मडुरा माऊली मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब आयोजित ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत श्रावणी परब विजेत्या ठरल्या. रिदिमा परब उपविजेत्या, तर अंजना सावळ तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. सावंतवाडी तालुका मराठा संघाच्या अध्यक्षा संजना परब यांच्या हस्ते श्रावणी परब यांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ६० हून अधिक महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला. विविध पाच फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा झाली. अंतिम फेरीत रिदीमा परब, सुवर्णा परब, प्रांजल जोशी, श्रावणी परब, नमिता मोरजकर, काजल परब, रेश्मा परब, अंजना सावळ, नंदिनी सावळ व रिना परब या दहा स्पर्धकांत चुरशीची लढत झाली. यात श्रावणी परब पैठणीच्या विजेत्या ठरल्या. द्वितीय रिदीमा परब व तृतीय अंजना सावळ यांना रोख पारितोषिके देण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, तेजश्री परब, नवरात्रोत्सव समिती अध्यक्ष दत्ताराम परब, सचिव संतोष परब उपस्थित होते. मळेवाड सरपंच हेमंत मराठे यांनी सूत्रसंचालन, अभय परब, गणेश सातार्डेकर, नितीन नाईक व बाळू गावडे यांनी गुणलेखन केले.