झेंडूच्या दरातील तफावतीचा ग्राहकांना ऐन सणात फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेंडूच्या दरातील तफावतीचा 
ग्राहकांना ऐन सणात फटका
झेंडूच्या दरातील तफावतीचा ग्राहकांना ऐन सणात फटका

झेंडूच्या दरातील तफावतीचा ग्राहकांना ऐन सणात फटका

sakal_logo
By

54496
सावंतवाडी ः शहरात विक्रीसाठी आलेली झेंडूची फूले.

झेंडूच्या दरातील तफावतीचा
ग्राहकांना ऐन सणात फटका
सावंतवाडी, ता. ४ ः विजयादशमी सणानिमित्त बाजारपेठेत दाखल झालेल्या झेंडूच्या फुलांच्या दारात तफावत दिसून येत आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. झेंडूची फुले दोनशे रुपयांपासून १२० रुपये अशा फरकाने विविध ठिकाणी विकली जात असल्याने व्यवसायिकांच्या विरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
विजयादशमीला झेंडूंच्या फुलांना महत्त्व आहे. हेच महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी घाटमाथ्यावरून व्यावसायिक झेंडूची फुले विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये घेऊन येतात. आता मोठ्या प्रमाणात व्यावसायिक बाजारपेठेमध्ये हा व्यवसाय न करता ग्रामीण भागातील रस्त्यावर, हायवेच्या कडेला बसून ही फुले विकतात. त्यामुळे त्यांचा चांगला व्यवसायही होतो; परंतु त्यांच्याकडील झेंडूच्या फुलाच्या दरात आणि बाजारपेठेमध्ये मुख्य शहरात मिळणाऱ्या झेंडूच्या फुलांमध्ये ६०-७० रुपयांची तफावत असल्याने या विक्रीबाबत ग्राहकांची लूटमार होत असल्याचे दिसून येते. ही झेंडूचे फुले घाटमाथ्यावरून आणली जातात. एकूणच मार्केटवरील परिस्थितीवरून हा दर निश्चित केला जातो. सावंतवाडी शहराचाच विचार करता निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळे दर पाहायला मिळत आहेत. यावर स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. अशा प्रकारची लूट निश्चितच योग्य नाही असे मत अनेक सुजाण नागरिकांकडून व्यक्त केले जात होते.